Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ मार्च, २०२६

*इंदापूर महाविद्यालयात शनिवार दिनांक १४ मार्च रोजी संस्थेचे* *अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आर्टिफिशियल* *इंटेलिजन्स’वर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे* *आयोजन, पुणे सोलापूर मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन*.

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*




इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून तंत्रज्ञानातील वेगाने होत असलेल्या बदलांची ओळख आणि त्याची भविष्यकालीन उपयुक्तता याबाबत तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या

या चर्चासत्रासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंढरपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. बब्रुवान रोंगे, जी. एच. रायसोनी कॉलेज, वाघोली ( पुणे ) येथील प्रा. राहुल नवले आणि प्रा. राहुल बोराटे यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ शिक्षण क्षेत्रातील ए.आय चा वापर, जनरेटिव्ह ए. आय. तसेच २१ व्या शतकातील शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या ए. आय. साक्षरतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राच्या नोंदणीला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे ९० प्राध्यापक, विद्यापीठ क्षेत्राबाहेरील सुमारे ६० प्राध्यापक तसेच १०० हून अधिक जिज्ञासू विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर या चर्चासत्रात विशेष चर्चा होणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून महाविद्यालयाचे प्राचार्य व आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जीवन सरवदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. शिवाजी वीर, एआरसी समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले, कार्यक्रम समन्वयक प्रा. विरेश होळकुंदे, नॅक समन्वयक डॉ. सुरेंद्र शिंदे तसेच संपूर्ण आयोजन समितीने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे चर्चासत्र ठरणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा