*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
संपूर्ण देशभरात उजनीतील मासे मार्केट साठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सहकारातील युवा नेते संदीप चित्तरंजन पाटील व उपसभापती पदी सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीचे मार्गदर्शक, माजी सभापती तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सभापती, उपसभापती निवडीची सूचना मांडली. त्यास बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक दत्तात्रय फडतरे यांनी अनुमोदन दिले. मावळते सभापती तुषार जाधव तसेच उपसभापती मनोहर ढुके यांनी दरम्यानच्या कालावधीमध्ये बाजार समितीचे बाजार समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे व सर्व संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन बाजार समितीचे मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतकरी केंद्रबिंदू मानून आवश्यक आधुनिक सुविधा उभारणी करून बाजार समितीचा नावलौकिक वाढविला. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन बाजार समितीची उलाढाल उच्चांकी म्हणजे ३८५ कोटीच्या पुढे गेली आहे. सभापती व उपसभापती यांनी बाजार समितीच्या कामकाजात दुरदृष्टीचा विचार करून, पूर्ण वेळ देऊन शिस्तबद्ध कामकाज केले. त्याबद्दल मोहोळचे माजी आमदार यशवंत माने व बाजार समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे यांनी नुतन सभापती व उपसभापती तसेच मावळते सभापती व उपसभापती यांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांनी सर्व संचालक मंडळाशी विचार विनिमय करून बाजार समितीचे संचालक म्हणून अतिशय अल्पावधीत शेतकऱ्यांशी नाळ जोडून सर्व सर्वसामान्यांच्या विकासाकरीता व हितासाठी कार्यरत असलेले उमदे युवा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व असणारे इंदापूर वि.का. सोसायटी व शिवाजी नागरी पतसंस्थेचे संचालक पदाचा सहकार क्षेत्रातील अनुभव असणारे संदीप चित्तरंजन पाटील यांची बाजार समितीच्या सभापती पदी निवडीची घोषणा केली. शेटफळगढे ग्रामपंचायतीच्या सरपंच, जिजाऊ महिला ग्रामीण पतसंस्था, वि.का. सोसायटीच्या संचालक अश्या स्थानिक स्वराज्य व सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांची यावेळी उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी अमोल भोईटे व उपाध्यक्ष पदी विष्णुपंत देवकाते यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इंदापूर सहाय्यक निबंधक बी. के. शिवरकर व सहाय्यक अधिकारी म्हणून श्रीमती गोलांडे मॅडम यांनी कामकाज पाहिले.
यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अघ्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाजार समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार यशवंत माने, नगराध्यक्ष भरत शहा, माजी सभापती मयुरसिंह पाटील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुंमत कोकाटे व ॲड तेजसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे गट नेते श्रीमंत ढोले, सचिन सपकळ, अतुल झगडे, कांतीलाल झगडे, सागर मिसाळ, चित्तरंजन पाटील, प्रतापराव पालवे, संतोष वाबळे, गजानन जगताप, धनंजय पाटील, मेघश्याम पाटील, दत्तात्रय शिर्के, डॉ. नंदकुमार सोनवणे, विजय देवकर, आबा वीर, बाळासाहेब ढवळे, प्रशांत उंबरे, अक्षय सुर्यवंशी, अजिंक्य जावीर, शकीलभाई सय्यद, नुतन पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, ज्योत्सना सुरुडकर, विमल काळे, धनश्री पाटील, शिवाजी मोहिते, बापुराव शेंडे, जितेंद्र वणवे, किर्ती काळे, दिलीप भिसे, सौ. कल्पना पाटील, सौ. अर्चना खबाले, रणजीत भोंग, अर्शद सय्यद, आदिकुमार गांधी, किशोर बागल, दिपक झालटे, हर्षल पाटील, हणमंत शिंदे, बाजार समितीचे संचालक विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, तुषार जाधव, रोहीत मोहोळकर, मनोहर ढुके, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, प्रभारी सचिव संतोष देवकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रतिक घोगरे, मकरंद जगताप, कैलास येरळकर, हरिदास जाधव, सचिन जाधव, बाळासो शिंदे, जयंत जाधव, चंद्रकांत बोराटे, प्रतिभा पवार, रामचंद्र रुपनवर, व विविध संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी, आडते-व्यापारी, हमाल-मापाडी उपस्थित होते.
शेतकरी सुखी तर जग सुखी हे तत्व केंद्रबिंदू मानून मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे, संचालक मंडळ यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा कारभार पारदर्शी करण्यास प्राधान्य आहे. समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून बाजार समितीचे कामकाज अतिशय जोमाने विकासात्मक भूमिका घेऊन सदैव कार्यरत राहू असे नुतन सभापती संदीप चित्तरंजन पाटील व उपसभापती सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार जाधव व आभार प्रदर्शन रोहित मोहोळकर यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा