*पुणे, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*
श्रमण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर
श्री भगवान महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक जयंती महोत्सवानिमित्त आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज पुणे च्या वतीने मंगळवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी सव्वासात वाजता भव्य शोभायात्रा तसेच सकाळी नऊ वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद दरबार ही संस्था
अल्पावधीत व अल्प दरात रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरली असून संस्था दुसऱ्या वर्धापनदिनाकडे गरुड भरारी घेत आहे.दर्जेदार आरोग्य सुविधा व नामांकित कंपन्यांची औषधे असल्याने रुग्णांना रामबाण गुण येत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले आहे.
शोभायात्रेचा प्रारंभ
आर.के. इम्पीरियल आंबेगाव रोड येथील मनोजजी सुराणा यांच्या निवासस्थाना पासून होणार असून समारोप आनंद दरबार, दत्तनगर येथे होणार आहे. या शोभायात्रेत सहभागी १२ वर्षाच्या सर्व मुलामुलींना सौ. स्मिता विलासजी कोटेचा परिवार यांच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहेत. यावेळी सौ. सुजाता मनोजजी सुराणा व सौ. योगिता उदयजी दुगड यांच्या वतीने नाश्ता तर
गौतम प्रसादाचे आयोजन राजमाता आनंदीबाई रतनचंदजी धोका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन आनंद सहयोग ग्रुपचे अध्यक्ष अमित कोटेचा व सर्व सभासद यांनी केले आहे.
दंत तपासणी शिबिरात
डॉ. करिश्मा मुथा ( M.D.S. Ortho ),
डॉ. अपूर्वा देसाई ( B.D.S. F.I.Ε.),
डॉ. सिद्धार्थ सुखवाले ( B.D.S. Root Canal ) उपचार करणार आहेत.
यावेळी सिंगल सिटींग रूट कॅनल, दातासारखे सिमेंट भरणे, कवळी बसविणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, अक्कलदाढ काढणे, इम्प्लान्ट ( स्क्रूच्या सहाय्याने दात बसविणे), डिजिटल एक्सरे, मेटल सिरामिक, मेटल फ्री सिरामिक कॅप, दाताचे फॅक्चर, दात साफ करणे, दाढेत चांदी भरणे व इतर आजारावर दंतोपचार करण्यात येणार आहेत.
होमिओपॅथिक शिबिरात डॉ. जया जाधव ( B.H.M.S.)
डॉ. भूषण गंगवाल (M.D. Onko) व
डॉ. संदेश शहा ( B.H.M.S. Pune University ) होमिओपॅथिक सेवा देणार आहेत. यावेळी
सर्व प्रकारचे कॅन्सर, डायबेटीस, सर्व प्रकारचे त्वचारोग, बी. पी. समस्या, स्त्रीरोग, वंध्यत्व, मानसिक ताणतणाव, गुडघेदुखी, कंबरदुखी, सर्दी, खोकला, ताप, मूत्रपिंड विकार, मुतखडा, पित्ताशयाचे खडे, पोट साफ न होणे, केस गळती, थायरॉईड, हार्मोनल समस्या, लकवा, PCOD मासिक पाळी व मेनोपॉजच्या तक्रारी, लहान मुलांचे आजार व इतर दुर्धर आजार यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिकस, पुणे यांच्या वतीने मोफत शुगर तपासणी करण्यात येणार आहे तर सीबीसी व इतर तपासणीवर ३०% सवलत देण्यात येणार आहे.
आनंद दरबार संस्थेच्या
व्यवस्थापक डॉ. अंकिता धोका ( B.D.S. ), डॉ. अर्चना गादिया ( M.D. Hemoeopathy ) व
डॉ. रिटा कासार (Gen. Practice.) यांनी या शिबिराचे नियोजन केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन आनंद दरबार तसेच गुरु आनंद मेडीकल सेंटरचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा