Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*किंडर जॉय प्री-प्रायमरी सी.एस.सी. स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी* .

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा संगोबा  रोड येथील किंडर जॉय  सी.एस.सी. बाल विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बाळगोपाळांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व महाराजांचे पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवगीतावर मनसोक्त नृत्यांचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, महाराणी अशा वेगवेगळ्या वेशभूषा साकारून इतिहास जिवंत केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विध्यार्थी छत्रपती चौक येथे जाऊन ,शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून मानवंदना दिली. कार्यक्रमाध्ये किंडर जॉय प्री-प्रायमरी स्कूलच्या संचालिका सौ राजश्री धनराज कांबळे , यांनी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक , सौ . ढोळे, सौ . रांखुडे, सौ . खराडे सौ . जाधव या कर्मचारी वर्गाने  मोलाचे योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा