*उपसंपादक --नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लवंग येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अकलूज बीटच्या विस्तार अधिकारी सौ. भक्ती नाचणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तर सदर कार्यक्रमात महिलांसाठी आयोजित पाककृती स्पर्धेचे उद्घाटन सौ. मोहिनीताई प्रशांत पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंगच्या वैद्यकीय अधिकारी सौ. मेधा कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिला पालक श्रीम. सुरेखा वामन वाघ यांचेतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व सर्व महिला भगिनींना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंग यांचेतर्फे शाळेमध्ये महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले गेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी कदम मॅडम यांनी महिलांनी शरीरातील रक्तवाढीसाठी कोणता आहार घ्यावा, याविषयी विशेष मार्गदर्शन केले. तसेच 14 ते 15 वयोगटातील मुलींनी सोशल मीडियातील अफवांना बळी न पडता hpv लस घ्यावी, असे आवाहन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता, आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून सांगितले.
सदर दिवशी छाया हॉस्पिटल व प्रसुतिगृह 25/4, लवंग येथील डॉ गणेश मिटकल यांचेतर्फे खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले. त्याअंतर्गत मोफत औषधोपचार, वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन दिले गेले. डॉक्टरांनी अनिमिया रोगाबद्दल महिलांना सखोल माहिती दिली.
यावेळी महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले. पाककला स्पर्धेतही सर्व महिलांनी अतिशय सुंदर, रुचकर, चवदार आणि पौष्टिक पदार्थ तयार करून आणले होते. सदर दोन्ही स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी विविध प्रतिभाशाली महिलांच्या रूपरेखा साकारून सामाजिक संदेश देणारे एकपात्री सादरीकरण केले. तसेच गुढीपाडवा, पट वाढवा या उपक्रमांतर्गत पुढच्या वर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना शाळेतर्फे भेटवस्तू देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमात कु. श्रीशा धीरज वाघ, कु. मनाली महादेव साठे चि. आदित्य प्रदीप वाघ या चिमुरड्यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला.
पाककला स्पर्धेत सौ उज्वला गणेश पाटील यांनी प्रथम क्रमांक, सौ दिपाली प्रवीण वाघ यांनी द्वितीय क्रमांक तसेच सौ सारिका दत्तात्रय मोहरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मनोरंजनात्मक खेळ स्पर्धेत सौ. काजल सचिन पवळ यांनी प्रथम क्रमांक, सौ सुवर्णा महादेव साठे यांनी द्वितीय क्रमांक तसेच सौ पुनम आप्पा चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वरील सर्व विजेत्या रणरागिनींना तसेच पाककला स्पर्धेतील सर्वच सहभागी महिलांना शाळेतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता भोंग मॅडम यांनी केले, प्रास्ताविक सौ. शुभांगी हिरवे मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. अशोक पवार सर, श्री. करीम कोरबू सर, श्री. जाविद मुलाणी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा