*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
महिला शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विविध उपक्रमाव्दारे अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात येवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जे
मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या विचारांचे देखील आचरण केले पाहिजे. कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचा मागोवा घेतला. यावेळी प्रा. मयुरी जामदार, प्रा. ऋतुजा व्यवहारे, प्रा. राधिका घुगे तसेच विद्यार्थिनी सायली मखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तर प्रा. स्वाती राऊत यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित कवितेचे सादरीकरण केले.
यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. गजानन ढोबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम माने, डॉ. आत्माराम फलफले, हिंदी विभाग प्रमुख प्रा. शितल माने, प्रा. प्रकाश करे, प्रा. पुरुषोत्तम साठे, प्रा. शिवाजी राजगुरू, प्रा. दर्शन दळवी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. तानाजी कसबे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सोनल जमदाडे यांनी मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा