*सहसंपादक --डॉ.संदेश शहा*
*इंदापूर --मो:-9922419159*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील हर्ष प्रतीक शिंदे हे सनदी लेखपाल ( सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. हर्ष शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ( ICAI ) ची सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन हे प्रतिष्ठेचे यश संपादन केले.
हर्ष शिंदे यांचे पूर्व प्राथमिकचे शिक्षण इंदापूर येथील गारटकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे झाले. उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयात झाले. हर्ष शिंदे हे एल.आय.सी.चे इंदापूर येथील सेवानिवृत्त विकास अधिकारी प्रतिक सुधाकर शिंदे यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान, इंदापूरचे सुपुत्र हर्ष शिंदे हे सीए झालेबद्दल त्यांचे सद्गुरू असोसिएट चे संस्थापक डॉ. श्रेणिक शहा, देवराज जाधव, वसंतराव माळुंजकर, आझाद पटेल, संदीप शहा, संदीप पांढरे, डॉ. संदेश शहा आदींनी अभिनंदन केले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक राजेंद्र कवडे देशमुख यांनी देखील हर्ष याचे विशेष अभिनंदन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा