Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ मार्च, २०२६

*महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



मुंबई- संपूर्ण देशात सध्या राज्ययसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे ६ उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील.


तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर इंडिया अलायन्सचे मोठे नेते शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा झाली. आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

शरद पवारांच्या उमेदवारीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे आणि नेत्यांचे आभार मानते. मी आणि जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन तास सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी मोठ्या मनाने शरद पवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी काँग्रेसचे आभार मानते. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानणार आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. एका जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे. काही अपक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे एक जागा ते सहज निवडून आणू शकतात. राज्यसभा निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या सपंतीच्या 37 मतांची गरज आहे. आवश्यक असलेली मते शरद पवार यांना सहज मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे शरद पवार हे राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा