*करमाळा, तालुका --प्रतिनिधी
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
आमदार नारायण आबा पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या मतांवरती करमाळा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी मिळवली.आमदार झाल्यावर अगदी पहिल्याच दिवसापासून मतदार संघातील विकासकामे करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी अजितदादांकडे वारंवार पाठपुरावा चालू ठेवला.
*"करमाळा तालुक्यावर असलेली अजितदादांची नाळ व प्रेम खरंच नावण्याजोगी होत ते मी प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं आहे.करमाळा मतदारसंघावर असलेल दादांच प्रेम हे मी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासोबत जात असल्याने अगदी जवळून पाहिल होत.आमदार नारायण आबा पाटील यांनी सुरुवातीपासूनच करमाळा मतदारसंघामध्ये रस्ते-पूल -पाणी-लाईट या कामांना महत्त्व दिलं असून पैकी आज पोमलवाडी-चांडगाव "अजित सेतूला " ३४० कोटी निधी मंजूर झाला."*
खरंतर याचं सर्व श्रेय हे अजितदादांना जाते.ज्या-ज्या वेळी मला आमदार नारायण आबा पाटील यांच्यासोबत अजितदादांच्या कॅबिनला जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी दादांनी आमदार नारायण आबा पाटील यांना *"या नारायणराव ही त्यांच्या भाषा शैलीत मारलेली हाक खरंच आजही कानात घुमत आहे."*
*खरंच आज दादांची करमाळा विधानसभा मतदारसंघाला गरज भासत असुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी असलेला मायेचा आधार दादांच्या जाण्याने दुरावला आहे.पण या एक वर्षाच्या कालावधीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या सोबत जाऊन अजितदादांच्या घेतलेल्या भेटी खरंच खूप काही शिकवून गेल्या.अजितदादांसारख महान नेतृत्व पुन्हा कोणी होऊ शकणार नाही हे त्रिकाल सत्य आहे.अशा या महान व्यक्तिमहत्वाला माझ्याकडून पोमलवाडी-चांडगाव पुलाची ३४० कोटींची मंजुरी हीच भावपूर्ण श्रद्धांजली





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा