Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*करमाळा शहरातील अवघ्या पाच वर्षीय अर्षद शेख या चिमुकल्याने केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा रोजा पूर्ण*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा शहरातील नालबंद नगर येथील अर्षद नौशाद शेख या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास दिवसभर अन्न,पाणी वर्ज्य करून १४ तास कडक उपवास करतात असाच महत्त्वाचा उपवास हर्षद शेख या चिमुकलयाने केला 

अर्षद याने कमी वयामध्ये कडक असा उपवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपवासाच्या वेळेस त्याला नवीन कपडे पुष्पहार घालून त्याचा सत्कार करण्यात आला इस्लाम धर्माच्या रितीरिवाजा नुसार त्याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम धर्मियांमधून विशेष अभिनंदन होत आहे 


त्याने सदरचा एक दिवसाचा रोजा नालबंद नगर येथील आयशा मशिदीमध्ये उपवास सोडला यावेळी मौलाना हाफिज सय्यद अली मुजावर, अर्षद चे आजोबा शौकत रऊफ शेख सहित बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

अवघ्या पाच वर्षाच्या वयामध्ये अर्षद याने एक दिवसाचा कडक असा रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मात्र सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा