Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ मार्च, २०२६

शाैर्य पाटीलची नवाेदयासाठी निवड

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



रूई,ता.बार्शी,जि.साेलापूर येथील शाैर्य इंद्रजीत पाटील याची सन् २०२६ या चालू शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवाेदयासाठी निवड झाली आहे.मल्टी पर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल,गाैडगाव,ता.बार्शी या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या या विद्यार्थ्याने ग्रामीण भागातून घवघवीत यश मिळवले.त्याने ९७.५० इतके गुण घेऊन साेलापूर जिल्ह्यातून ४१ वा क्रमांक मिळवला.त्याबद्दल कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी संस्थेने त्याचा व त्याचे वडील सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील आई साै.शुभांगी पाटील यांचा यथाेचित सत्कार केला.                                                                             


  .या विद्यार्थ्यास झुंजकर मॅडम,चव्हाण सर,प्रवीण बनकर सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्यामुळेच ताे हा यश संपादन करू शकला.सदर विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर,जीवन लाेहाेकरे सर,संजय भड सर,जीवराज गरड सर यांनी त्याचे विशेष काैतुक केले.संस्थेचे अध्यक्ष मा.विनायकराव गरड,सचिव मा.पंडितराव लाेहाेकरे सर,सदस्य मा.संताेष भड यांनी त्याचा व पालकांचा विशेष सत्कार केला.त्याचबरोबर मा.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल (भैया) कुतवळ,चंद्रकांत पाटील सर,रावसाहेब पाटील सर,भागवत उकिरंडे सर,अमाेल देशमुख सर यांनीही त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा