*आलिमभाई. शेख*
*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी केली असून
१,०७,०००/- रू कि.चे ०९ ग्रॅम सोन्याचे गंठण, रोख रक्कम, पैंजण व अंगठी जप्त, स्टॅन्डवर गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महिला आरोपीस करमाळा पोलिसांनी अटक केली आहे
याबाबत करमाळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की
दि. २४/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे सौ कमल शिवाजी खुळे रा सावंत गल्ली करमाळा या त्यांचे मुलीला भेटणेकरीता लोहगावा पुणे येथे जाणेसाठी करमाळा बस स्थानक येथील फलाट क्रं. १ परांडा स्वारगेट बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने स्वताचे आर्थिक फायदयाकरीता मुददाम लबाडीने अप्रामाणिकपणे फिर्यादीचे पर्समध्ये असलेले ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ३०००/-रू रोख रक्कम, ५००/-रू.चे पैंजण व १५,०००/-रू कि.ची सोन्याची लेडीज अंगठी अशी फिर्यादीचे संमतीवाचून चोरून घेवुन गेल्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. २३९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सुचना व मार्गदर्शन करून आरोपी पकडणेकामी पथक रवाना केले. आरोपीच्या मागावर गुन्हे प्रकटीकरण पथक असताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्या फुटेजमध्ये एक महिला फिर्यादीचे पाठीमागे संशयितरित्या वावरताना दिसून आली त्यावेळी फुटेजमधील महिलेचा शोध घेतला असता सदरची महिला ही मौजे मिरगव्हाण ता करमाळा येथील सौ गुडडी चैतन्य काळे ही असलेचे निष्पन्न झाले सदर महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आलेने तिचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता तिने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असून तीस अटक करण्यात आली आहे अटक मुदतीत तिवेकडून गुन्हयातील गेला माल ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १५००/-रू रोख रक्कम, ५००/-रू. वे लहान मुलीचे पैंजण व १५,०००/-रू कि.ची सोन्याची लेडीज अंगठी असा एकुण १,०७,०००/- रू कि.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे नमुद गुन्हयाचा अधिक तपास पोहेका / १६८२ मोहोळकर हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही. एस (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६८२ मोहोळकर, पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना /११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/ २५ हनुमंत भराटे, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा