*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
रिपब्लिकन सेनेच्या वतीने करमाळा शहरातील सर्व झोपडपट्टी अधिकृत करण्यात यावे अन्यथा येत्या दिनांक 13 मे 2026 रोजी करमाळा नगर परिषदेसमोर चक्री उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेनी एका निवेदनाद्वारे दिला आह
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की
करमाळा शहरामध्ये सन १९८० सालापासून बेघर आणि गरीब रहिवाशांनी करमाळा नगर परिषद हद्दीमध्ये झोपड्या बांधवांना राहत आहेत त्यांना नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जोडणी दिलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने वीज जोडणी दिलेली आहे गेली 40 वर्षापासून करमाळा शहरात सुमंत नगर झोपडपट्टी. सिद्धार्थ नगर झोपडपट्टी. संभाजीनगर झोपडपट्टी .फंड गल्ली स्वां मील शेजारील झोपडपट्टी. जामखेड रोड झोपडपट्टी .मोहल्ला गल्ली झोपडपट्टी. चांदगुंड गल्ली झोपडपट्टी. यल्लमा मंदिर झोपडपट्टी . मौलाली नगर झोपडपट्टी. रंभापुरा झोपडपट्टी. व इतर करमाळा शहरातील लहान लहान झोपडपट्ट्यांमध्ये सर्व जाती-धर्माचे बेघर लोक झोपडी बांधून राहत आहेत या झोपड्यांना बरेच दिवस झाले असल्यामुळे ते आता सध्या राहण्यायोग्य राहिले नाहीत तरी येत्या पावसाळ्यामध्ये झोपड्या पडून जीवित होणे होण्याची शक्यता आहे तरी महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्रमांक ०८१०/प्र क्र ९६/२०१८ झोपसु _१ मंत्रालय मुंबई दि १६/मे/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व झोपडपट्टी धारकांना महाराष्ट्र शासन झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम 1971 मधील तरंगतीनुसार झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी आहे त्या ठिकाणाची जागा त्यांच्या नावे करून सिटीसर्वे ला त्यांची नोंद करून त्या ठिकाणी घरकुल मंजूर करून झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनात केली आहे
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन हा विषय गेल्या एक वर्षांपूर्वी माननीय आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या आम सभेमध्ये हा विषय मांडला होता त्यावेळेस माननीय आमदार नारायण आबा पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तपसे यांना आदेश देऊन सुद्धा झोपडपट्टी निर्मूलन या विषयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केलेला आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना त्वरित आदेश देऊन करमाळा शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पंचनामे व मोजमापे करून तसे अहवाल प्रांत अधिकारी यांना देऊन लवकरात लवकर करमाळा शहरातील सर्व ठिकाणची झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेना चे जिल्हाध्यक्ष देवा लोंढे यांनी निवेदनात केली आहे सदर निवेदनावर असंख्य करमाळा शहरातील झोपडपट्टी धारकांच्या तसेच रिपब्लिकन सेना च्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत
जर करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिनांक 12/ 5/ 2026 पर्यंत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात कामकाजास सुरुवात नाही केली तर दिनांक 13/ 5/ 2026 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करमाळा नगरपरिषद कार्यालयासमोर चक्री उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी व इथून पुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक संदीप कांबळे तसेच रिपब्लिकन सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओहोळ यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा