*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
. अंजना कृष्णा, सहाय्यक पोलीस अधिक्षक, करमाळा पोलीस उपविभाग करमाळा यांनी करमाळा उपविभागाकडील मंगेश विलास पवार (पोहवा/1624), संभाजी गुंडीबा पवार (पोकॉ/224), विद्या नामदेव इंगोले (मपोकॉ/2042), गणेश रामचंद्र गुटाळ (चापोकॉ/2008) यांना करमाळा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री आणि तस्करीवर पेट्रोलिंग करून कठोर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.
वरिष्ठांच्या निर्देशांनुसार, करमाळा उपविभागाकडील पोलीस अंमलदारांनी खालील प्रमाणे कारवाई केली त्याबाबत सविस्तर वृत्त असेकी
मौजे सावडी, ता. करमाळा अंतर्गत सावडी फाटा येथे रोडच्या उत्तर बाजूस असलेल्या टपरी वजा हॉटेल या ठिकाणी इसम प्रथमेश शिवाजी झाकणे, वय 21 वर्षे, रा. कुस्करवाडी, कोर्टी, ता. करमाळा याने विनापरवाना, बिगरपास, बिगरपरमिटने आपले ताब्यात देशी व विदेशी दारूच्या एकूण 171 सिलबंद कॉर्टर असा एकूण रक्कम 25,820/- रूपये किंमतीची दारू विक्री करण्याच्या उद्देषांने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने नमुद आरोपीच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचा तपास पोहवा/1784 सुहास पवार ने. करमाळा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा