*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
भोंदूबाबा, मनोहर मामा भोसले व त्याचे सहका-यावर फसवणुक आणि जादुटोणा विरोधी कायदयानुसार करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. करण्यात आला असून याबाबत सविस्तर वृत्त असे की
मौजे उंदरगाव ता. करमाळा येथे असलेले भोंदुबाबा मनोहर भोसले व त्याचे साथीदार नाथबाबा (पुर्ण नाव माहीत नाही) यांचेविरूध्द फिर्यादी अ.ब.क यांनी दि.२८/०४/०२६ रोजी फिर्याद दिल्याने करमाळापोलीस ठाणे गु.र. नं३८२/२०२६ भा न्या संहिता कलम ३१८(२), ३१८(४),३ (५), महाराष्ट् नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांचे उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३(२), ३ (३) प्रमाणे दि.२८/०४/२०२६ रोजी १५/३६ वा. गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यात हकीकत अशी की,
यातील फिर्यादी अ.ब.क, यांनी समक्ष करमाळा पोलीस ठाणेस हजर असून जबाब दिला असुन त्यामध्ये त्यांनी ते करीत असलेल्या व्यवसायामध्ये फिर्यादी यांना यश मिळत नव्हते व त्यांचे मणक्यामध्ये त्रास होत असल्याने ते त्रस्त होते. त्यादरम्यान ते मौजे आवालवाडी ता. हवेली जि. पुणे येथील माजी सरपंच राजेंद्र आवाळे यांच्या घराचे फर्नीचरचे काम करीत होते. त्यामुळे राजेंद्र आवाळे व त्यांची ओळख झालेली होती. एके दिवशी राजेंद्र आवाळे यांच्याशी बोलत असताना त्यांनी व्यवसायमध्ये त्यांना यश मिळत नाही व त्यांचे मणक्यामध्ये त्रास होत असल्याचे त्यांना सांगितले, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, करमाळा तालुक्यात मनोहर मामा भोसले नावाचे एक महाराज आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावा, तुमच्या सर्व अडअडचणी दूर होतील. त्यानंतर फिर्यादी सन २०२० मध्ये कोरोना लॉकडाउन चालु होणेच्या पुर्वी तीन ते चार महिने अगोदर (नक्की तारीख वेळ आठवत नाही) मौजे उंदरगाव ता. करमाळा येथे माजी सरपंच राजेंद्र आवाळे यांच्यासोबत आले होते. त्यावेळी त्यांनी तेथे पाहीले की, शिवसिध्दी संचलित श्री मामा संस्था नावाने मठ असून तेथील महाराज मनोहर मामा भोसले हे लोकांचे भविष्य पाहून त्यांना उपाय सांगतात, त्यांचे मठात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आलेले होते. ते मठात प्रवेश करतेवेळी गेटवर फिर्यादीकडुन ५०००/- रूपयाची पावती करून घेतली व त्यांनी फिर्यादीस सांगितले की, तुमचा ०३ ते ०४ तासानंतर नंबर येईल तुम्ही बसुन घ्या, त्यानंतर फिर्यादी ०४ तास थांबल्यानंतर त्यांचा नंबर आला. त्यावेळी फिर्यादी मनोहर मामा समोर बसले असता मनोहर मामाने फिर्यादीचे वैयक्तीक कुटुंबातील ब-याच लोकांची नावे व माहीती सांगुन, तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळत नाही, मणक्यामधील त्रास व तुमची काही अडचण आहे ती दुर होईल तुम्ही नाथ बाबाकडे जावा असे सांगुन फिर्यादीस दुस-या रूम मध्ये जाण्यास सांगितले. त्यावेळी तेथे एक अनोळखी व्यक्ती होता. त्याने फिर्यादीस सांगितले की, मी नाथबाबा असून मनोहर मामा यांचा सहकारी आहे. आता महाराज मनोहर मामाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व फरक पडेल तुम्ही येथे ५०,०००/- रू दया असे म्हणाल्यानंतर फिर्यादीने तेथे त्या व्यक्तीकडे ५०,०००/- रूपये दिले, परंतु त्यांनी फिर्यादीस कोणतीही पावती दिलेली नाही. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस पांढ-या रंगाच्या डब्यामध्ये पिवळ्या रंगाची हळदीसारखी पावडर भंडारा म्हणून दिली व फिर्यादीचा मोबाईल नंबर घेउन तुम्हाला
चार ते पाच दिवसानी मी फोन करतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी तेथुन त्यांचे पुणे येथे घरी गेलो. त्यानंतर आठ ते दहा दिवसानी फिर्यादीस त्यांचे मोबाईलवर व्हॉटसअप कॉल आला व समोरून नाथबाबा बोलत आहे असे म्हणुन फिर्यादीस विचारले की, तुम्हाला बरे वाटत आहे का? काय फरक पडला आहे का? त्यावर फिर्यादीने त्यांना मला फरक पडला नाही, मला पुर्वीसारखाच त्रास होत आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी फिर्यादीस सांगितले की, मी मनोहर मामाला निरोप देतो. व दोन दिवसानी फोन करतो, त्यानंतर दोन दिवसानी फिर्यादीस त्यांचा फोन आला व त्यांनी फिर्यादीस सांगितले की, महाराज मनोहर मामा एक धागा तुमच्या गळयात बांधायला देणार आहेत, त्यानंतर तुम्हाला चांगला फरक पडेल असे सांगुन फिर्यादीस त्यांनी १,५१,०००/- रूपये तुम्हाला दयावे लागतील असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्यांना माझेकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीस सांगितले की, तुम्ही पैसे जमा करून मला फोन करा, मनोहर मामा पुण्याला आल्यानंतर ते तुम्हाला धागा बांधायला देतील. तेव्हा मी दोन दिवस विचार करून मी माझे मित्राकडून १,२१,०००/- उसने पैसे घेउन मी नाथबाबा यांना व्हॉटसअप कॉल करून सांगितले. त्यानंतर तीन-चार दिवसात मला पुन्हा नाथबाबा यांचा व्हॉटसअप कॉल अला व त्यांनी मला सांगितले की, आम्ही पुण्याला आलो आहे, तुम्ही हाडपसर येथे गाडीतळ आकाशवाणी समोर या असे सांगितल्याने मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी मनोहर मामा यांनी माझे गळ्यात एक धागा बांधला व एक पुडी दिली त्यामध्ये राख व तांदळाचे दाणे होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना १.२१,०००/- रु रोख दिले त्यानंतर त्यांनी सदरचे पुडी पाण्यात टाकुन पिण्याबाबत सांगितले, त्यानंतर दूसरे दिवशी फिर्यादीने सदरची पुडीतील राख व तांदळाचे दाणे पाण्यात टाकुन पिले परंतु तरीही फिर्यादीस काहीही फरक पडलेला नाही. यावरून त्यांची फसवणूक झाली असल्याचे खात्री झाली परंतु फिर्यादी बाहेर राज्यातुन काम करण्याकरीता महाराष्ट्रात आलेले होते व फिर्यादीचे महाराष्ट्रात फारसे कोणी ओळखीचे नसल्याने फिर्यादीने कोठेही तक्रार दिली नाही. त्यानंतर मागील २ ते ३ दिवसापूर्वी फिर्यादीस फसवणूक करणारा महाराज मनोहर मामा भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे व त्यास अटक झाल्याचे सोशल मिडीयावरून समजले. त्यानंतर फिर्यादी त्याचे मित्राशी व घरातील लोकांशी चर्चा करून आज रोजी तक्रार देण्यासाठी करमाळा पोलीस ठाणेस आले आहे. त्याप्रमाणे त्याची फिर्याद घेवुन रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई/ज्ञानेश्वर दळवी हे करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा