Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ एप्रिल, २०२६

अल्प कालावधीत सुमारे 32 लाख रुपयाचा नफा मिळवणारी करमाळा येथील फॅबटेक मल्टीस्टेट शाखा यांचे कार्य उल्लेखनीय ..

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा बस स्थानका समोरील तसेच बँक ऑफ इंडिया शेजारील फॅबटेक मल्टीस्टेट या शाखेने उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केले आहे करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये या शाखेचे त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे नाव उंचावले आहे सदर शाखेने सुमारे 32 लाख रुपयाचा नफा मिळवला आहे

करमाळा येथे फॅबटेक मल्टीस्टेटने २१ महिन्यात उत्कृष्ट काम केले आहे. फॅबटेक मल्टीस्टेटचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२४ ला करमाळा शाखा सुरु झाली होती. ३१ मार्च २०२६ पर्यंत शाखेने उत्कृष्ट काम केले, असल्याचे सांगितले जात आहे. फॅबटेक मल्टीस्टेटच्या एकूण ठेवी ६ कोटी १५ लाख रुपये आहेत. गोल्ड लोन २ कोटी ३२ लाख रुपये आहेत तर इतर लोन ३ कोटी ६ लाख रुपये आहेत. यातून एकुण नफा ३२ लाख १० हजार झाला असून एकुण व्यवसाय ११ कोटी ५३ लाख रूपये झाला आहे. मार्च २०२६ पर्यन्तचा हा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले असून सर्व ठेवीदार व कर्जदार यांच्यासह करमाळा शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी योगदान महत्वाचे आहे.

सदर शाखेने आजही उल्लेखनीय चांगले कार्य केले असून तालुक्यामध्ये सदरची शाखाही एक उत्कृष्ट शाखा म्हणून नावाजलेली आहे यामध्ये शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची करमाळा येथील शाखा उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने कामकाज करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा