Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ एप्रिल, २०२६

माळेवाडी-अकलूज येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान संपन्न

 *अकलूज प्रतिनिधी* 

*एहसान मुलाणी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9096837451*



राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती व द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात निमित्त तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंतीनिमित्त माळेवाडी-अकलूज येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ.बालाजी जाधव यांचे प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडले.



            कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील तसेच अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.


   या प्रसंगी डॉ. जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, महात्मा फुले हे धर्मविरोधक नव्हते, तर ते अंधश्रद्धा, अन्याय आणि सामाजिक विषमतेविरोधात लढणारे विचारवंत होते. तसेच त्यांनी म.फुले यांच्या जीवनातील विविध पैलूंवर आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत प्रकाश टाकत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.


          या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक उत्तमराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर फुले, संचालक जयदीप एकतपुरे, सुनंदा फुले, भारत फुले, प्रा. अरुण खंडागळे, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक नामदेव गलांडे, स्वाती फुले, रेश्मा तांबोळी, अझर शेख, मंदाकिनी पाडोळे, उज्वला विटकर, ॲड. वजीर शेख, बाळासाहेब धाईंजे, अमोल फुले, प्रा. विठ्ठलराव साळुंखे (तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ), नवनाथ कोडग (जिल्हा उपाध्यक्ष)तुकाराम साळुंके, अक्काताई माने,मनोरमा लावंड (जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड), शारदा चव्हाण (तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड), राजेंद्र फुले,उमेश फुले, उमेश एकतपुरे, सचिन एकतपुरे, अजित माने(संभाजी ब्रिगेड), शिवाजीराव लोंढे,गजानन फुले,मधुकर फुले,किसनराव एकतपुरे, राजेंद्र बनकर, राम‌भाऊ एकतपुरे ,अर्जुन शिंदे ,मारुती बनकर, ज्ञानेश्वर फुले,ज्ञानेश्वर (माऊली) फुले, जालिंदर फुले, तुषार केंगार तसेच बहुजन समाजातील विविध संघटनांचे कार्यकर्ते, संत सावतामाळी मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व माळेवाडी-अकलूज येथील ग्रामस्थ,सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा फुले यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमोल माने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा