Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ एप्रिल, २०२६

"माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव" योजनेतंर्गत काटी, निरवांगी आरोग्य केंद्रांचा आढावा; कर्मचारी-नागरिकांत सुसंवाद राखून आदर्श आरोग्य केंद्र निर्माण करण्याचे जिल्हा परिषदचे गटनेते श्रीमंत ढोले यांचे आवाहन

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



-----ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा खंबीर निर्धार जिल्हा परिषदेचे गटनेते व सदस्य श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला. 

    काटी आणि निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा श्रीमंत ढोले यांनी बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. "माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव" या संकल्पनेतून मतदारसंघाला आरोग्यदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

     प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना त्वरित सेवा द्यावी, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही. आरोग्य केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. रुग्णांना उपचारासाठी ताटकळत ठेवले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. आरोग्य केंद्राचा परिसर आणि रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छता चोख ठेवण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. केंद्रात आवश्यक औषधांचा साठा आणि आपत्कालीन सेवांची सज्जता याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीदरम्यान ढोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांना व्हिडीओ कॉल करून उपस्थित कर्मचान्यांना कामकाजाबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. कर्मचारी आणि नागरिक यांच्यात सुसंवाद राखून एक आदर्श आरोग्य केंद्र निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती सुरेखा पोळ, पंचायत समिती सदस्य व गटनेते बापूसाहेब शेंडे, सोमनाथ वाघमोडे, साहेबराव मोहिते, विपुल वाघमोडे, दिगंबर निंबाळकर, विठ्ठल जाधव, विठ्ठल पवार, रणजीत रासकर, रवींद्र पोळ, गावातील स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा