Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० एप्रिल, २०२६

*शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आरोग्य शिबिरात 489 रुग्णांची तपासणी, 372 रुग्णांना मोफत चष्मे वाटप*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मदतीचे आधार केंद्र बनले आहे, असे मत सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी व्यक्त केले.  

पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, नगरसेवक दादा इंदुलकर, आदिनाथ संचालक देवानंद बागल आदी मान्यवर उपस्थित होते.  



यावेळी जतन फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने अमेरिकन बनावटीचे अत्यंत दर्जेदार चष्मे मोफत वाटण्यात आले. लाखो रुपयांच्या औषधी गोळ्या गरजू रुग्णांना मोफत देण्यात आल्या.  

आरोग्य शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय, नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, सुविधा हॉस्पिटल बार्शी, गरुड हॉस्पिटल अहमदनगर आदी हॉस्पिटलमधील तज्ञ 40 डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.  




हे शिबीर यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुका वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख नागेश शेंडगे, संजय जगताप, राजेंद्र मिरगळ, निलेश चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, शहर प्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी परिश्रम घेतले. 

यावेळी उपस्थित सर्व 400 वारकरी रुग्णांना ज्ञानेश्वरीची प्रत भेट देण्यात आली.  

या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा व आरोग्य शिबिरासाठी गुरुमाऊली दिंडोरीकर महाराज, नाशिक यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.  

करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने 38 आरोग्य शिबिरे घेऊन जवळपास 15,000 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेने कोरोना काळात सुरू केलेले अन्नछत्र व रुग्णांना केलेली कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत उल्लेखनीय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा