*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
वाघोली ता.माळशिरस येथील प्रगतशिल शेतकरी बाळकृष्ण शंकरराव माने- शेंडगे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृधपकाळाने निधन झाले. कै.बाळकृष्ण शेंडगे हे अत्यंत धार्मिक व मनमिळावु स्वभावाचे होते.त्यांच्या पाश्च्यात पाच कर्तबगार मुले, नातवंडे,परतुंडे असा मोठा परीवार असुन वाघोली येथे चंद्रभागा नदिच्या काठावर असलेल्या स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले.कै.शेंडगे यांच्या स्मृतिनिमित्त अस्थी रक्षा विसर्जण करुन त्या जागेवर वृक्षारोपन करण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे यांचे ते वडील होते,तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांचे ते चुलते होते. सर्व थरातील हजारो नागरिक , नातेवाईक अत्यंविधीसाठी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा