Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*करमाळा पोलीस ठाण्याची कामगिरी पोलीस असल्याचे बतावणी करून ६.५० तोळे वजनाचे ९,७५,०००/-रुपये किमतीचे सध्याचा भाव सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून केली गुन्ह्याची उकल*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



-: करमाळा पोलीस ठाणेची कौतुकास्पद  कामगिरी :-

-: पोलीस बतावणी करून ६.५० तोळे वजनाचे ९,७५,०००/- किंमतीचे (सध्याचा भाव) सोन्यांचे दागिने फसवणुक करून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून गुन्हयांची  उकल केली आहे

या बाबत सविस्तर हकिगत अशी कि फिर्यादी नामे कौशल्या मोहनराव शेलार वय ६८ वर्षे धंदा गृहीणी रा गणेश नगर करमाळा जि सोलापुर यां दिनांक २४/०३/२०२६ रोजी १३/३० वा चे सुमारास देवीच्या माळाचे पुढे टागडे मळा येथे टमटमने जात असताना त्यांना अडवुन दोन मोटार सायकल वरती चार अनोळखी इसमांनी येवुन आम्ही पोलीस असल्याचे पोलीस असल्याचे सांगुन आमची चेकिंग चालु आहे. आज एका महिलेस चाकु दाखवून लुटलेले आहे. चोरटे दिवसा देखील फिरत आहेत. असे म्हणुन त्यांतील एका इसमांने फिर्यादीस तुमचे हातातील व गळयातील सोन्याचे दागिणे तुम्ही लगेच काढा व तुमचे पर्स मध्ये ठेवा असे सांगुन त्यांने त्यांचे पोलीस ओळखपत्र फिर्यादीस दाखवले तेंव्हा तो इसम पोलीस असल्याचे फिर्यादी यांना वाटल्याने फिर्यादीने त्यांचे डावे हातातील दोन बांगडया व पाटली व गळयातील सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवा असे फिर्यादीस सांगुन फिर्यादीस परत दुस-या एका इसमाने एक पांढरा कागद देवुन त्यांमध्ये सर्व दागिणे ठेवुन पर्स मध्ये ठेवण्यास सांगितले तेव्हा त्यांच इसमाने फिर्यादीस आमची चेंकिंग चालु आहे. तुमच्या पर्स मध्ये गांजा असल्याचा आंम्हाला संशय आहे. तुम्हांला चेंक करायचे आहे. असे म्हणुन फिर्यादीची अचानक पर्स उचलुन ते सर्वजण करमाळयाच्या दिशेने मोटार सायकलवर बसुन पळुन गेले. चोरीस गेलेले मालाचे वर्णन खालील प्रमाणे -

१) ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया

२) २५ ग्रॅम वजनाची एक पाटली

३) १० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मिनी गंठण

वरील वर्णनाचे सोन्याचे दागिणे चार अनोळखी इसमाने पोलीस बतावणी करून चोरून घेवुन गेले आहे. म्हणुन फिर्यादी यांनी करमाळा पोलीस ठाणे गुरनं २४१/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३१८(४),२०४,३, (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सुचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते. गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक मागावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत, तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही चे अवलोकनाच्या आधारे पोनि रणजित माने यांनी सदरचे गुन्हयातील आरोपी निषन्न करून ओळखले असता त्यांची नावे खालील प्रमाणे -

१) कंबर उर्फ डंबर शहाजहान ईराणी वय ४५ वर्षे रा श्रीरामपुर जि अहिल्यानगर

२) अन्सेन बरकतआली ईराणी वय २० वर्षे रा भिवंडी मुंबई

३) रिजवाण खान जमान ईराणी

४) सौढा शब्बीर ईराणी दोघे रा करोत भोपाळ मध्यप्रदेश सध्या ईराणी गल्ली परळी जि बीड

यातील आरोपी १) कंबर उर्फ डंबर शहाजहान ईराणी वय ४५ वर्षे रा श्रीरामपुर जि अहिल्यानगर सध्या ईराणी गल्ली परळी जि बीड यांस अटक करून त्याचे कडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देवुन चोरलेले

१) ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया

२) २५ ग्रॅम वजनाची एक पाटली

३) १० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मिनी गंठण असे सोन्याचे दागिणे निवेदन करून काढुन दिल्याने गुन्हयातील गेला माल ६.५० तोळे सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. गुन्हयाचा अधिक तपास चालु असुन उर्वरीत आरोपी अटक करीत आहोत. नमुद गुन्हयाचा तपास सपोनि मनोज अभंग हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही.एस (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज अभंग पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना /९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/ २५ हनुमंत भराटे, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल, पोकॉ १२५७ अमोल पवार, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा