*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
दिगंबरराव बागल विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. हनुमंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार अंगीकारल्यास विद्यार्थी ज्ञानसमृद्ध व गुणसंपन्न होऊ शकतात.” त्यांनी बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात आधुनिक काळातील विविध आव्हानांचा सामना करन्याविषयी भाष्य केले.
कार्यक्रमात शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे व विष्णू पोळ, दादा जाधव
यांनीही मनोगत व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन सर्व शिक्षक बांधवांनी केले.
जयंतीचे औचित्य साधत शिक्षक कल्याणराव साळुंके यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मुख्याध्यापकांचे हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सीताराम बनसोडे यांनी केले. शेवटी कल्याणराव साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास , किशोर कदम, बलभीम वाघमारे , संतोष घोरपडे, नंदू कांबळे यांनी परिश्रम घेतले. या वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा