Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

विद्यार्थ्यांच्या करीअरला मिळाली नवी दिशा: करमाळ्यात यशवंत अकॅडमीचे भव्य उद्घाटन उद्घाटन सोहळ्यात डॉ. नितीन कदम सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा येथील गायकवाड चौक येथे शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी यशवंत अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला . त्यानंतर यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित करीअर गायडन्स 

या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

         यावेळी भविष्यातील करिअरची यशस्वी पायाभरणी’ या विषयावर दिशा अकॅडमी, वाईचे संस्थापक डॉ. नितीन कदम सर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग उलगडून सांगितला.

        या सोहळ्याचे उद्घाटन  जेष्ठ मार्गदर्शक तथा विद्याविकास मंडळाचे सचिव मा. श्री. विलासरावजी घुमरे सर यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. गणेश करे पाटील सर यांनी भूषविले.



           प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मिलिंद फंड सर, मा. श्री. संजय राजगुरु साहेब, मा. श्री. बाळकृष्ण लावंड सर, मा. श्री. बाळासाहेब नरारे सर आणि मा. श्री. कल्याणराव साळुंके सर यांची उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी मा.श्री विलासराव घुमरे सर यांनी करमाळ्यातील शैक्षणिक परिस्थितीचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी यशवंत अकॅडमीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणातून डॉ. गणेश करे पाटील सरांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी व खर्च टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर दर्जेदार शिक्षण संस्थांची गरज अधोरेखित करत यशवंत करीअर अकॅडमी ही शैक्षणिक संस्था यासाठी विशेष प्रयत्न करेन असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. नितीन कदम यांनी 

आपल्या मार्गदर्शनात ठामपणे सांगितले की,  करिअर गुणांवर नव्हे तर क्षमतेवर ठरवा. गुणपत्रिकेतील आकड्यांपेक्षाही विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक उपजत क्षमता महत्वाच्या आहेत . याचा विचार केल्यास    विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी दिशा निश्चित मिळेल. यावेळी त्यांनी फाऊंडेशन कोर्सेसचे महत्त्वही अधोरेखित केले व पालकांनी यासाठी योग्य वेळेत मुलांना त्यांच्या आवडी व क्षमतांनुसार करिअर निवडू दिल्यास प्रतिकूल परिस्थितीतही ते खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. दत्तू इवरे सर यांनी दोन्ही अकॅडमींच्या शैक्षणिक कार्यसंस्कृतीचे कौतुक केले. या प्रसंगी IIT मधील सिद्धेश श्रीरामे आणि NIT मधील श्रेयस काटुळे यांच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयेश पवार सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे सर व प्रा. संदिप इवरे सर यांनी केले तर प्रा. राहुल श्रीरामे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. विनिता कांबळे मॅडम, सौ. माधुरी पवार मॅडम, सौ. सुवर्णा कांबळे मॅडम, श्रीमती अश्विनी पवार मॅडम, श्री. संतोष कांबळे सर, श्री. अतुल दाभाडे सर, श्री. संदिप पवार सर, श्री. कौस्तुभ सौंदाणे आदींचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा