Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

*इंदापूर बाजार समितीमध्ये रब्बी हंगामाकरीता हमीभाव दरात मका शेतमाल खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरु : सभापती संदीप पाटील यांची माहिती*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*



इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवर इंदापूर येथे रब्बी हंगाम सन २०२६ हमीभाव ( आधारभूत दरात ) शासकीय मका खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणी सुरु केली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांनी दिली.  

शासकीय हमीभाव दरात मका शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी सन २०२६ मधील पिकाची ( मका ) रब्बी अशी नोंद असलेला डिजीटल सातबारा व  आठ अ उतारा, अद्यावत आधारकार्ड झेरॉक्स, आधारलिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक प्रथम पान झेरॉक्स ( आधारकार्ड व मोबाईल नंबर लिंक असलेले ) मका उत्पादक शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. नोंदणी ही बायोमॅट्रिक मशीनवर असल्यामुळे नोंदणीधारक शेतकरी स्वत: हजर राहणे आवश्यक आहे.

मुख्य व उपबाजार भुसार मार्केटमध्ये नविन ज्वारी, गहू, हरभरा आवक सुरु झाली आहे. ज्वारीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये, गहू प्रति क्विंटल बत्तीसशे रुपये, हरभरा प्रति क्विंटल बावनशे रुपये उच्चांकी दराने विक्री झालेला आहे. मुख्य बाजार इंदापूर येथे चालु सप्ताहात दैनंदिन पेरु आठ ते एक्केचाळीस रुपये प्रति किलो, तर कांदा प्रति क्विंटल तीनशे ते तेराशे रुपये  या दराने विक्री झाली आहे.

 आधारभुत दरात ( हमीभाव ) मका विक्रीसाठी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणेत यावी असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे मार्गदर्शक व संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले.

शेतमाल बाजारभावात घसरण झाल्याने  बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या शेतीमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर अकलुज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारणी केली आहे. बाजार समितीने उपलब्ध केलेल्या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांनी केले आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक तथा माजी आमदार यशवंत (तात्या) माने, माजी सभापती विलासराव माने, तुषार जाधव, दत्तात्रय फडतरे, संचालक मधुकर भरणे,    मनोहर ढुके, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते,  संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा,  सुभाष दिवसे व सचिव  संतोष देवकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा