Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

*अनुपम आय हॉस्पिटल यांच्यावतीने पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.* आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पेशंटसाठी "अनुपम विजन सेंटर" सुरू.

  अकलूज प्रतिनिधी 

 टाइम्स 45 न्यूज मराठी 



अकलूज येथील सुप्रसिद्ध अनुपम आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटर यांच्यावतीने माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघातील पत्रकार व नातेवाईकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुका पंचायत समितीचे तरूण व तडफदार सभापती दत्तात्रय रावसाहेब मगर यांचे हस्ते श्री गणेश पूजन करून व दीप प्रज्वलीत करण्यात आले. पत्रकार बांधव अहोरात्र सर्वांसाठी परिश्रमाने समाजापर्यंत सभोवतालच्या परिसरातील बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवतात.त्यांचे डोळ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर येथील डॉ.महावीर गांधी,डॉ.निखिल गांधी,डॉ.राजीव गांधी यांनी पत्रकार संघातील सर्व पत्रकार तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या डोळ्यांची मोफत नेत्र तपासणी करून दिली.




               सभापती मगर यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला. तसेच भविष्यात अशा प्रकारचे नेत्र शिबीर घेण्यासाठी पंचायत समिती मार्फत कोणती मदत लागल्यास आम्ही ती करण्यास तयार असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना डॉ.निखिल गांधी यांनी आपल्या हॉस्पिटलचे गेली ४२ वर्षांची परंपरा सर्व पत्रकारांना सांगितली.हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी लागणारे सर्व लेटेस्ट मशनरी उपलब्ध असल्याचे डॉ.निखिल गांधी यांनी यावेळी सांगितले.चष्माचा नंबर घालवण्यासाठी असणारे लसीक हे ऑपरेशनचे मशीन आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.ज्या तपासण्यासाठी रुग्णांना पुणे,मुंबई येथे जावे लागू नये अशा सर्व अत्याधुनिक मशनरी आपल्या येथे उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच डॉ.राजीव गांधी हे व्ही आर सर्जन असून ते डोळ्यांच्या  पडद्याच्या तपासण्या करतात. नियोजित कालावधी पूर्वी जन्मलेल्या बाळांची पडद्याची तपासणी म्हणजेच ROP देखील डॉक्टर राजीव करतात हे सांगितले. हॉस्पिटलतर्फे घेतले जाणारे वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये मोफत नेत्र शिबिर तर आहेच परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पेशंटसाठी अकलूजमध्ये आपण अनुपम विजन सेंटर या नावाने एक युनिट सुरू केले आहे.या व्हिजन सेंटरमध्ये पेशंटला नाममात्र तपासणी घेतली जाते.तसेच त्यांना लागणारे ऑपरेशन हे अत्यंत अल्प दरात करून दिले जाते.

         माळशिरस तालुक्यातील सर्व शाळांची नेत्र तपासणी करण्याचे ध्येय असल्याचे डॉ.निखिल गांधी यांनी आवर्जून सांगितले व त्यासाठी पत्रकार बांधव व पंचायत समिती यांचे सहकार्य लाभावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर आणि अनुपम आय फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ.महावीर खुशालचंद गांधी,डॉ. निखिल महावीर गांधी,डॉ.राजीव महावीर गांधी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकार आणि त्यांचे नातेवाईक यांची मोफत नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले याबद्दल सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी पत्रकार संघाच्या वतीने ऋण व्यक्त केले.याप्रसंगी अनुपम हॉस्पिटल स्टाफ राम पाटील,नाजनीन शेख, डॉ.समीक्षा भगत,डॉ.निकिता दमळे,मॅनेजरआशुतोष देशपांडे, माधवी हरीओम माने,सुनिता गुंड, सारिका पवार,प्रणोती राजेंद्र माने, स्वाती गायकवाड,निकिता हजारे, महेक मुलाणी,शबनम नदाफ, प्रशांत पवार,सनी वायकर,अंकिता अजगिरे इत्यादी सर्वांचा पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा