Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

पुनर्वसन कार्यालय स्थलांतर पंढरपुर ला होणार ...आजी माजी नेत्यांनी ऑफीस करमाळ्यात रहावे यासाठी प्रयत्न करावे...संजय (बापु) घोलप

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील व इंदापूर, कर्जत गावांचा  पुनर्वसन कार्यालय हे करमाळा शहरात जुने कोर्टे येथे बरेच वर्षापासुन कार्यरत आहे ते पंढरपुर येथे स्थलांतरित होऊ नये यासाठी तालुक्यातील आजी माजी नेत्याने मा.विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे प्रयत्न करावे असे मत मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा यांनी व्यक्त केले 

करमाळा तालुक्यातील सध्या बरेच उपविभाग आहेत परंतु मुख्याकार्यालय हे करमाळा तालुक्यात कधीही येत नाही तशी तालुक्यातील बाजारपेठेची आवस्था खुप बिकट आहे असे जर उप विभाग कार्यालय पण तालुक्यातुन बाजारपेठ बाहेर तालुक्यात जायला लागले तरं ह्याचा परीणाम येथील शेतकरी वर्गावर होणार असुन कोणत्याही कामासाठी पुनर्वसन विभागातील पूर्ण दिवस जाऊन पैसे पण येण्यास जाण्यासाठी चौपट खर्च होणार आहे अशा अनेक गोष्टींवर परीणाम दिसून येईल 

करमाळा तालुका हा नावालाच फक्त तालुका राहीला असुन एक मोठ खेड असे संबोधले तरं खरे ठरणार आहे न midc ना मोठे  उद्योग ,मेडीकल काॅलेज ना इंजिनिअरिंग काॅलेज नविन करमाळा तालुक्यातील विकासासाठी आजी माजी नेत्याने आज पर्यंत काय केले आता आहे हे तरी जपा ही करमाळा तालुक्यातील व शहरातील शहरातील नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने नम्र विनंती करत आहोत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा