Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

*अकलुज व परिसरात हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम साजरी.*

 अकलूज प्रतिनिधी

टाइम्स 45 न्यूज मराठी 



अकलुज व परिसरात हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवुन भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          आज हनुमान जयंती निमित्त अकलुजच्या हनुमान मंदीरात पहाटे ५ वा.हनुमानाच्या मुर्तीस अभिषेक करुन महापूजा करण्यात आली.स्थानिक भजनी मंडळाने भजन करीत सकाळी ६:३० च्या सुमारास हनुमान भक्तांच्या जयजयकारात पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पांडुरंगराव देशमुख यांच्यासह भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थित भक्तांना प्रसादाचा लाभ देण्यात आला.



      शंकरनगर येथील हनुमान मंदिरात अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हनुमान मुर्तीस अभिषेक व महापुजा करण्यात आली.यावेळी कांचनमालादेवी मोहिते-पाटील यांच्यासह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थित भक्तांना प्रसादाचा लाभ देण्यात आला.धवल श्रीराम मंदिरात अभिषेक व महापुजा करण्यात येवून माऊली व श्रीराम भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनात पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी श्रीराम सार्वजनिक ट्रस्टचे उपाध्यक्ष आण्णासाहेब शिंदे,सचिव विलास लोंढे,वैभव पाटील,नितीन शिंदे,पिंटु वैद्य,ज्योती कुंभार व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थिताना प्रसाद देण्यात आला.हनुमान तालीम चौकातील हनुमान मंदिरात महापुजा आरती होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली.तर जुना बाजार तळावरील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र राज्य सकल वडार समाज शाखा अकलूज व एस बी ग्रुपच्यावतीने अध्यक्ष लक्ष्मण बंदपट्टे यांच्या मार्गदर्शना खाली हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबीरात १९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील,नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील,सयाजीराजे मोहिते पाटील यांच्यासह सर्व नगरसेवका़चा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित भक्तगणांना महाप्रसाद लाभ देण्यात आला. सायंकाळी हनुमान जयंती निमित्ताने हनुमानाच्या प्रतिमेची सवाद्यात शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेचा शुभारंभ माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शोभायात्रेत सकल वडार समाजाचे बांधव भगिनी सहभागी झाले होते.संपुर्ण अकलुज शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा