Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

*करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी* *घरफोडी करून ९०,०००/-रूपये सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून गुन्हयांची केली उकल*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा शहरात घरफोडी करणाऱ्या दरोडेखोऱ्याच्या करमाळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला अटक केली आहे याबाबतची माहिती अशी की सुनील रंगनाथ गोरे वय ५४ वर्षे धंदा चालक रा सिध्दार्थनगर करमाळा ता करमाळा जि सोलापुर यांनी दि. ०१/०४/२०२६ रोजी सकाळी ०९/०० वा चे सुमारास फिर्यादी हे घरामध्ये एकटेच असल्याने व घरामध्ये भरपुर पसारा अवरण्याचे काम असल्याने त्यांचे हातामध्ये असलेली सोन्याची अंगठी खराब होईल म्हणुन फिर्यादी यांनी उजव्या हातातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी काढली व फिर्यादी चे घरातील दिवाणचे गादी खाली ठेवली व फिर्यादी यांना रंभापुरा करमाळा येथे ज्योतीबा देवीचे आरती ला जायचे असल्याने फिर्यादी यांनी लगबगीत काम अवरून दुपारी १२/३० वा चे सुमारास फिर्यादी ने घराला कुलूप लावले व रंभापुर येथे देवाची अरतीला गेले गडबडी मध्ये फिर्यादी हे हातामध्ये अंगठी घालायची विसरले आरती झाले नंतर फिर्यादी यांनी गावातील काम आटोपले व सांयकाळी ०४/०० वा चे सुमारास फिर्यादी हे घरी आले तेव्हा त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडला व आत मध्ये गेले तेव्हा फिर्यादी यांना घराचा मागील दरवाजा अर्धवट उघडा असलेला दिसला व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तेव्हा फिर्यादी यांनी घरात पाहणी केली असता फिर्यादी यांना घरातील कपाट उघडे दिसले व त्यातील ड्राव्हर खाली पडलेला दिसला तसेच दिवणची गादी हि बाजुला सरकवलेली दिसली तेव्हा फिर्यादी यांनी कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व दिवाणचे गादी खाली ठेवलेली सोन्याची अंगठी पाहिली असता ती त्यांना दिसली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पाठीमागील दरवाज्याकडे जावुन पाहिले असता त्याचे आतील बाजुस असलेला कडी कोयंडा दरवाजा फाकवुन तोडलेला दिसला तेव्हा फिर्यादी यांना खात्री झाली कि, कोणीतरी त्यांचे घरात मध्ये चोरी केली आहे. चोरीस गेलेले मालाचे वर्णन १) ७५,०००/-रूपये किंमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची पिळयाची अंगठी २) १५,०००/- रोख रक्क्म असे त्यांचे राहते घरातुन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून घेवुन गेले आहे. म्हणुन फिर्यादी यांनी करमाळा पोलीस ठाणे गुरनं २९०/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०५ (अ),३११(३),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सुचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले. गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक मागावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत, तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही चे अवलोकनाच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) करण ज्ञानदेव भोसले वय ३२ वर्षे २) ओंकार उर्फ दादया पप्पु रजपुत वय २० वर्षे ३) विधी संघर्ष बालक वय १७ वर्षे तीघे रा सिध्दार्थ नगर करमाळा ता करमाळा जि सोलापुर अशी माहीती मिळाल्याने आरोपीचा माग घेत पोलीस पथक रवाना झाले होते. गुन्हयातील गेलामाल व आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे १) करण ज्ञानदेव भोसले वय ३२ वर्षे २) ओंकार उर्फ दादया पप्पु रजपुत वय २० वर्षे ३) विधी संघर्ष बालक वय १७ वर्षे तीघे रा सिध्दार्थ नगर करमाळा ता करमाळा जि सोलापुर हे मिळुन आले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यानी सदर गुन्हयाची कबुली देवुन चोरलेले सोन्याची अंगठी व रोख रक्कम हे काढुन दिल्याने गुन्हयातील गेला माल पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कि रु ७५,०००/- कि. चे व रोख रक्कम १५,०००/-रूपये मिळुन आले आहे. अधिक तपास चालू आहे. सदर गुन्हयाचा तपास पोना ५३८ अशपाक शेख हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही. एस (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/ २५ हनुमंत भराटे, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल, पोना ५३८ शेख यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा