Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*इथे ओशाळला महाराष्ट्र*

 *बी.टी.शिवशरण,--श्रीपूर*



ज्यांच्या बलिदानाने त्यागाने पराक्रमाने महाराष्ट्रातील देव धर्म आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहिली रयतेचे खऱ्या अर्थाने राज्य नांदू शकले इथली प्रजा सुरक्षित राहिली कुणबी बारा बलुतेदार यांना न्याय मिळण्याची सुरक्षित हमी होती असा एकमेव राजा जगाच्या नकाशात आपलं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करून गेला आपण जे आता स्वाभिमानी हक्काने सुखी जिवन व्यतीत आहोत त्याचे पुर्ण श्रेय कृपाशीर्वाद युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे अनंत उपकार आहेत आणि आज त्यांच्या नावावर समाजकारण राजकारण धर्मकारण करुन जाती जातीत धर्मात वाद निर्माण करुन समता बंधुता सलोखा धोक्यात आणू पहात आहेत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेले खेलोबाचे अंजनगाव या ठिकाणी धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या खेलोबा मंदिर परिसरात असलेल्या जागेच्या एका गट क्रमांक वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे.                           



          त्यामुळे सदर पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थान ची आहे असे पुजारी मंडळी व तमाम धनगर बांधवांची आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध केला जात आहे असे मराठा बांधवांना वाटत आहे त्यामुळे गेल्या पाच ते सात दिवसांपासून महाराष्ट्रात हा निर्माण केलेला वाद चर्चेत आहे गाजत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वारंवार बैठका चर्चा करून हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सातत्याने सुरू केले आहेत माध्यमांनी हा विषय लाऊन धरला आहे एकंदरीत या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांच्या सकारात्मक भुमिकेतून या गावातील दोन्ही गटां बरोबर चर्चा करून म्हणणं ऐकून व सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आले आहे त्यामुळे तणाव निवळला आहे अशी परिस्थिती आहे  मुळात हा वाद टोकाला जाऊ देणं हे स्थानिक लोकप्रतिनिधी पुजारी मंडळी व धनगर समाजाचे नेते यांचे अपयश आहे जातीधर्माच्या नावावर समाजकारण करणारे प्रवृत्ती सामाजिक सलोखा बंधुता बिघडणार नाही याकडे गांभीर्याने त्यांनी पाहणे अपेक्षित होते असो वेळ निघून गेलेली आहे सुदैवाने महाराष्ट्रात त्याचे वेगळं वळण लागून काही अनिष्ट घडलं नाही ही जमेची बाजू आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांची मार्गदर्शनाची पेरणी करण्यात आपण कमी पडलो आहोत हे दुर्दैव आहे समाज मोठा आहे धर्म आदर्श आहे मात्र नेतृत्व छोटं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श संकल्पनेतील विचारधारेचा सर्वच नेत्यांनी पुढार्यांनी बासनात गुंडाळून ठेवले आहे व केवळ निवडणुका आल्या की राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो हे लांच्छनास्पद आहे एकंदरीत या सर्व गंभीर चुका बाबी महाराष्ट्रात धोक्याची घंटा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा