उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आजचे युग हे स्पर्धेचे, वेगाचे आणि अचूकतेचे आहे.मी शिक्षिका असले तरी स्वतः एक पालक आहे, प्रत्येक पालकाची इच्छा काय असते हे समजू शकते ,असेच सर्व पालकांना वाटते की आपले मूल अभ्यासात हुशार असावे, आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे.
मात्र केवळ पुस्तकातील अभ्यास करून हे साध्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. अशा वेळी अबॅकस हे एक प्रभावी, वैज्ञानिक आणि दूरदृष्टी देणारे साधन म्हणून समोर येते.
अबॅकस म्हणजे फक्त आकडेमोड शिकण्याची पद्धत नाही, तर ती मेंदूच्या दोन्ही भागांचा — डावा (Left Brain) आणि उजवा (Right Brain) — समतोल विकास करणारी एक सशक्त प्रक्रिया आहे. डावा मेंदू तर्कशक्ती, गणिती कौशल्य, विश्लेषण आणि निर्णयक्षमतेसाठी कार्य करतो, तर उजवा मेंदू कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी जबाबदार असतो. अबॅकस शिकताना विद्यार्थी मनात मण्यांची प्रतिमा तयार करून गणना करतात. या प्रक्रियेमुळे एकाच वेळी दोन्ही मेंदू सक्रिय होतात. परिणामी विद्यार्थ्यांची विचारशक्ती अधिक वेगवान, स्पष्ट आणि संतुलित बनते.
अबॅकसचा सराव विद्यार्थ्यांमध्ये व्हिज्युअलायझेशनची अद्भुत क्षमता विकसित करतो. मनात आकडे “पाहण्याची” आणि त्यावर काम करण्याची ही सवय त्यांच्या स्मरणशक्तीला तीक्ष्ण करते. एकाग्रता वाढवते आणि अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजून घेणे सोपे करते. गणिताची भीती कमी होऊन त्या विषयात आत्मविश्वास निर्माण होतो.
आजच्या शिक्षणपद्धतीत आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये, वेळ आणि अचूकता हे यशाचे मुख्य घटक ठरतात. अनेकदा काही ठराविक गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरते. अशा वेळी अबॅकस शिकलेले विद्यार्थी गणिती प्रश्न जलद आणि अचूक सोडवतात, वेळेचे योग्य नियोजन करतात आणि आत्मविश्वासाने परीक्षा देतात. हाच फरक त्यांना इतरांपेक्षा पुढे नेतो. कधी कधी फक्त १-२ गुण कमी पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षेत्रात प्रवेश मिळत नाही आणि लाखो रुपयांची अतिरिक्त फी भरावी लागते.मी स्वतः माझ्या मुलासाठी एम बी ए चे ऍडमिशन घेताना... मुलाला थोडे मार्क कमी पडले व ८० हजारात मिळणाऱ्या ऍडमिशन साठी सहा लाख रू.जास्त फी भरून ऍडमिशन घ्यावे लागले आहे.एक दोन टक्क्यांची किंमत मला लाखो रुपयात मोजावी लागली आहे.
एक पालक आणि शिक्षक म्हणून मला वाटते अबॅकससारखे प्रशिक्षण त्या काही महत्त्वाच्या गुणांची भर घालू शकते.
अनेक पालकांना अबॅकस शिकण्यासाठी लागणारा खर्च सुरुवातीला जास्त वाटतो. परंतु खरे पाहता तो खर्च नसून एक दूरदृष्टीची गुंतवणूक आहे. आज थोडे पैसे खर्च करून जर मुलांमध्ये वेग, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास विकसित होत असेल, तर त्याचे फायदे आयुष्यभर मिळत राहतात. ही गुंतवणूक केवळ शालेय शिक्षणापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण करिअरला दिशा देणारी ठरते.
अबॅकस मुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ बौद्धिक नव्हे तर वैयक्तिक विकासही घडतो. आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता सुधारते, मल्टीटास्किंगची क्षमता निर्माण होते आणि कोणत्याही परिस्थितीत शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. हे गुण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
अबॅकस हे केवळ गणित शिकवणारे साधन नाही, तर विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना देणारे, त्यांच्या क्षमतांना नवी दिशा देणारे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घालणारे माध्यम आहे. आज केलेली ही छोटी गुंतवणूक उद्याच्या मोठ्या यशाची खात्री देणारी ठरते. त्यामुळे प्रत्येक पालकाने अबॅकसकडे केवळ एक कोर्स म्हणून न पाहता, आपल्या मुलांच्या आयुष्याला आकार देणारी एक सुवर्णसंधी म्हणून पाहणे आवश्यक आहे.आजचा abacus साठी केलेला छोटासा खर्च उद्याचे म्हणजेच १० वी,१२ वी नंतरचे तुमचे लाखो रुपये नक्कीच वाचवू शकेल.
नूरजहाँ फकरूदीन शेख
गणेशगाव
9146443282




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा