Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

*महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड* *अध्यक्षपदी सलीमखान पठाण,कार्याध्यक्ष मोहसिन पठाण,सचिव रफिक पठाण*.

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


मुस्लिम समाजातील पठाण बिरादरीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघ या संस्थेची स्थापना करण्यात आली असून राज्याध्यक्षपदी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांची निवड करण्यात आली आहे.


पठाण बिरादरीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या सभेत पठाण सेवा संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.बिरादरीच्या मुलांची शैक्षणिक प्रगती, सामाजिक विकास व महिलांना विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.पठाण बिरादरीचे जेष्ठ मार्गदर्शक हाजी शरीफखान पठाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी पठाण बिरादरीचे सहाशेपेक्षा जास्त कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र पठाण समाज सेवा संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- अमीर ए जमाअत - हाजी शरीफखान सांडूखान पठाण,अध्यक्ष -

हाजी सलीमखान चांदखान पठाण,कार्याध्यक्ष - मोहसीनखान भिकनखान पठाण,उपाध्यक्ष -अकबर नुरखान पठाण, अमजदखान जलीलखान पठाण,सचिव -रफिक अब्दुल पठाण,सहसचिव -

जुनेदखान शकीलखान पठाण,फिरोजखान बाबूखान पठाण, खजिनदार -फिरोज हसन पठाण,सह खजिनदार - रफीकखान शरीफखान पठाण,अमजद बादल पठाण,कार्यकारिणी सदस्य - रफिकखान शफिकखान पठाण,इम्तियाज हसनखान पठाण,नियाज गफूरखान पठाण,ॲड. मोहसीन बशीर पठाण, जावेद याकूब पठाण, खालीदखान खलीलखान (मुन्ना),इमदाद बाबासाहब पठाण,आरिफखान अली पठाण,मोहसीन सुलतान पठाण,एम.एम.पठाण,

महिला प्रतिनिधी - सौ.शाहीन समीरखान पठाण,सौ.जुलेखा राज मोहम्मद पठाण,सोशल सेल-मुन्ना पठाण,रज्जाक पठाण,रियाज पठाण, शमाभाई मुर्गीवाले, एज्युकेशन सेल - अरबाज पठाण, तौसिफ मन्सूर पठाण,मेडिकल सेल-डॉ. अरबाज पठाण, आफताबखान पठाण, आयटी सेल - शोएब पठाण,जेहान पठाण, अर्शान पठाण,नदीम पठाण, लीगल सेल - हाजी रियाज पठाण, ॲड. शाकीरखान पठाण, ॲड. एजाज पठाण, मीडिया सेल-तनवीर बडेसाब पठाण,आदिल अकील पठाण,सरफराज पठाण,बँकिंग सेल - फैयाजखान पठाण, युथ सेल-जियान पठाण, हुजेब पठाण,रेहान पठाण,आयान पठाण,रिलिजियस सेल - मौलाना अब्दुलकद्दूसखान पठाण,ऑफिस अश्फाक पठाण,दानिश दिलावर पठाण.

पठाण सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभरातील पठान बिराजदारीचे संघटन करून शैक्षणिक सामाजिक वार्षिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सलीमखान पठाण यांनी सांगितले.राज्यभरातील तालुका व जिल्हा कार्यकारिणीची स्थापना लवकरच करण्यात येणार असून संघटनेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अध्यक्ष सलीमखान पठाण - ९२२६४०८०८२ व कार्याध्यक्ष मोहसिनखान पठाण - ८६६८९९१८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा