*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत बोलताना व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड म्हणाले "भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदीय कामकाजाचे शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्याचे स्वप्न होते त्याची आज काळाची गरज आहे जेव्हा संसद तीन दिवस बंद पडते तेव्हा त्याचे नुकसान पाच कोटी दहा लाख रुपयांचे नुकसान होते दर सेकंदाला 36 हजारांची नुकसान होते एक तासाला 21 लाखाचे नुकसान होते पवित्र सभागृहात जाणारी माणसे विवेक विचारवंत तत्वचिंतक समाज प्रेमी आणि संवेदनशील मनाची असावेत राष्ट्रहित जोपासणारी असावेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे "चरित्रहीन आणि विनहिन मनुष्य हा पशुपेक्षा भयंकर असतो, सुशिक्षित मनुष्याचे शिक्षण गरीब जनतेच्या हितास विरोधी असेल तर तो समाजाला शाप ठरतो .
शिक्षणापेक्षा चारित्र्य अधिक महत्त्वाचे आहे . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घडवली,धरणांची आवश्यकता त्यातून ऊर्जा निर्मितीचे महान ध्येय ठेवून अनेक प्रकल्प हाती घेतले आणि ते पूर्ण केले स्वतंत्र भारताचे कायदामंत्री असताना पीडित शोषित अन्यायगग्रस्त दीन दलित वंचित यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यांना न्याय देण्यासाठी कायदे केले स्त्रियांच्या जीवनात सामाजिक आर्थिक क्रांती होण्यासाठी अनेक निर्णय घेतले श्रमजीवी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या,त्यांना कायद्याचे रूप दिले आज स्त्रिया रिक्षापासून अंतरिक्षा पर्यंत झेप घेत आहेत, श्रमजीवी कामगारांनी उद्योग क्षेत्रात भक्कम अधिष्ठान दिले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे सांगितली त्यानुसार आज जागतिक पातळीवर भारत एक महासत्ताशील राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीकोनातून आखलेला नदी जोड प्रकल्प आज वास्तवात येत आहे .
यावेळी सचिव डॉक्टर रवींद्र बेंदगुडे प्राचार्य रूपालीताई बेंदगुडे तसेच माननीय विजय महानगर सर उपस्थित होते याशिवाय डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी मधील सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा