Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

*शेतकऱ्यांसाठी कांदा पीक ठरतंय संकट* *कांदा पिकांने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



एकेकाळी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे कांदा पीक आज अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित बाजारभाव, बदलते हवामान आणि अपुरी सरकारी धोरणे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत

मोकळ्या आभाळाखाली शेती करताना शेतकरी भांडवल, कष्ट आणि नशीब या तिन्ही गोष्टींची गुंतवणूक करतो. मात्र, पीक येईपर्यंत निसर्गाचा फटका बसण्याची भीती असते, तर पीक बाजारात आल्यानंतर दरातील चढ-उतारामुळेही तोटा सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांत बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात


वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नाही. याशिवाय मजुरांची कमतरता, वाढती महागाई आणि रासायनिक वापरामुळे कांद्याची साठवणक्षमता कमी होणे या समस्या अधिक गंभीर ठरत आहेत.


सध्या तीव्र उन्हात कांदा काढणी सुरू असून मजूर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती पद्धतीत बदल करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कांदा लागवड व काढणीमध्ये यांत्रिकीकरण वाढवणे, बेड पद्धतीने लागवड करणे आणि सुधारित सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन साठवण क्षमता वाढू शकते.

कांदा साठवण आणि विक्री पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. बाजारात नवीन पद्धती स्वीकारल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. शेतकरी संघटना, कृषी विभाग आणि संबंधित संस्थांनी एकत्र येऊन शाश्वत मॉडेल तयार केल्यासच कांदा उत्पादकांचे भविष्य सुरक्षित राहील; अन्यथा भविष्यात कांदा उत्पादनात घट होऊन दरवाढ होण्याची शक्यता आहे.


चौकट

सध्या कांदा पीक घेणे मोठे कष्टाचे झाले असून कांदा पिकाला जिवापाड जगवायचे काढणी करायची साठवण करायची आणि शेवटी हातामध्ये काहीही पैसा मिळत नाही सध्या मोठ्या कांद्याला आठ रुपये तर लहान कांद्याला दोन रुपये भाव मिळत आहे त्यामुळे कांदा पीक घेणे म्हणजे मोठे जिकरीचे बनले आहे शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा 


दस्तगीर अब्दुल रहेमान पठाण 

 वडगाव तालुका करमाळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा