*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव बुधवार (ता. २२ एप्रिल) ते शनिवार (ता. २ मे) दरम्यान होणार आहे. उत्सवा निमित्ताने ११ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. मंगळवार (ता.२८ एप्रिल) दंत व डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर होणार आहे.
नृसिंह जयंती नवरात्र उत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम असे, बुधवार (ता. २२) बासरी वादन-नंदकुमार डिंगरे, नादब्रह्म भक्ती संगीत-नंदकुमार पाटील, प्रवचन- बाळासाहेब देशमुख, कीर्तन - आनंद काकडे. गुरूवारी (ता. २३) अभंगवाणी - निखिल नारायण कुलकर्णी, सुगम भक्ती संगीत - सार्थक राजेश बावकर, प्रवचन एकनाथ शाहूराव पाटील महाराज मेंढेकर, कीर्तन - प्रभंजन भगत महाराज, शुक्रवार (ता. २४)- भावगंध संगीत - नेहा देशपांडे, प्रवचन- प्रशांत अनंत सुरू, कीर्तन- राधिकाताई आडीवरेकर यांचे होणार आहे. शनिवारी (ता. २५) भक्तिसंगीत- पंडित कल्याण अपार व अजय देशपांडे, स्नेहा फडणीस, प्रवचन- पंडित विद्यार्थिनी आचार्य जोशी, कीर्तन - डॉ. सौ. अवंतिका टोळे रविवार (ता. २६) भक्तीसंगीत- शनिवार संगीत मंडळ, प्रवचन- सौ. मेघा नंदकुमार कुलकर्णी, कीर्तन - ज्ञानेश धानोरकर महाराज. सोमवारी (ता. २७) भक्ती संगीत- रमाकांत चाटी व सहकारी, प्रवचन -१००८ महंत तपोमुर्ती वेणा भारती महाराज, कीर्तन - लक्ष्मीप्रसाद पटवारी महाराज, मंगळवारी (ता. २८) प्रवचन- दामोदर आचार्य देशपांडे, कीर्तन - संज्योत केतकर, सुगम भक्ती संगीत -अनिरुद्ध जोशी, बुधवारी (ता. २९)- सुगम भक्तिसंगीत- रसिका व सानिका कुलकर्णी, प्रवचन- विनायक आचार्य, कीर्तन- संदीप मांडके महाराज, गुरूवारी (ता. ३०) सुगम भक्ति संगीत- अजित गोसावी महाराज, भक्ति संगित- राजश्री ओक व धनश्री देशपांडे, प्रवचन- मोहनबुवा रामदासी, नृसिंह जयंती कीर्तन राघवेंद्र देशपांडे रामदासी, हार्मोनिअम साथ- गंगाधर देव (पिरंगुट), तबला साथ दिनकर गोसावी (इंदापूर). शुक्रवार (ता.१ मे) छबिना श्रींची पालखी मिरवणूक, शनिवारी (ता.२ मे) - काल्याचे कीर्तन अंकुश महाराज रणखांबे यांचे होणार आहे.
जे एफ अजमेरा नेत्र रुग्णालय धाराशिव व श्री लक्ष्मी सिंह देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दंत व डोळे तपासणी शिबिर मंगळवारी (ता.२८) रोजी आयोजित करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट कडून मोफत चष्मे वाटप होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त, विश्वस्त मंडळी श्री लक्ष्मी देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपुर यांनी दिली आहे.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह व देवस्थान मंदिर दिसते आहे.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा