Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ एप्रिल, २०२६

*अखेरचा हा तुला दंडवत.....* *सुप्रसिद्ध पार्श्वगायिका "आशा भोसले "यांचे अल्पशा आजाराने निधन*

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाल

त्यांना ११ एप्रिल रोजी प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

छातीतील संसर्ग (chest infection) आणि तीव्र थकवा ही प्रमुख कारणे होती

उपचारादरम्यान त्यांचा मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू झाला आहे 

मुंबईतील  ब्रिज कँडी हॉस्पिटल l येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला  

त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे

त्यांना राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार आहे 

सुमारे ७ दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात योगदान

११,००० अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली

दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण यांसारखे अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते  

त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान आणि अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

आशा भोसले यांचे निधन म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रासाठी एक मोठी हानी असून, त्यांचा आवाज आणि गाणी कायम स्मरणात राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा