Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

इंदापूरात परशुराम जयंती निमित्त सवाद्य पालखी मिरवणूक.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



इंदापूर ब्राम्हण सेवा संघाच्या वतीने परशुराम जयंती निमित्त सवाद्य पालखी मिरवणूक संपन्न झाली. मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आलेल्या या जयंती उत्सवात महिलांचे टाळ पथक लक्षवेधी ठरले



 इंदापूरातील ज्येष्ठ पुरोहित बळवंत जोशी व दिलीप पाठक यांच्या हस्ते परशुरामांच्या नवीन मुर्तीवर  अभिषेक झाल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गोसावी विठ्ठल मंदिरातून श्रींच्या नवीन मुर्तीची पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत समाजातील महिला, पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महिलांचे टाळ पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पालखी मिरवणुक नेहमीच्या मार्गाने जात असताना खडकपूरा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला वंदन करुन,परत गोसावी विठ्ठल मंदिरात आली. तेथे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी दिलीप कुलकर्णी यांनी हनुमान चालिसाचे सुश्राव्य पठण केले.



  यावेळी प्रमुख वक्ते ॲड. सतिश देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाने कसे राहिले पाहिजे यांची पंचसूत्री कथन केली तर सौ. रेखा जोशी यांनी समाजात स्त्रीयांचे महत्त्व व त्यांचे अधिकार या विषयाची मुद्देसूद मांडणी केली. प्रसाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली

भाजपचे नेते प्रदीप गारटकर, विधिज्ञ विजय अजोतीकर, दादासाहेब क्षीरसागर, विवेक दुनाखे, माधव देशपांडे, शाम महाजन, प्रसिद्ध तबला वादक दिनकर गोसावी, माजी नगरसेवक गणेश महाजन, मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल उन्हाळे, विष्णू ओंकार,अश्विनी दुनाखे, रसिका देशपांडे, राणी देशपांडे, हेमा बाब्रस, सुनिता कुलकर्णी, जया राव व समाजातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा