Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

*वारकरी संप्रदायामुळे लोकशाही जिवंत!!* *शिवसेना नेते शशिकांत जाधव!!*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन एक वर्ष अखंडपणे पत्रकारिता केली. हे करत असताना वारकरी संप्रदायाची अहोरात्र सेवा केली. त्यांचे पुत्र नरसिंह चिवटे यांनी तब्बल 51 वर्षे पत्रकारिता करून सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम केले. अशा पूजनीय व्यक्तीचा मला सन्मान करण्याचे भाग्य लाभले, असे मत शिवसेनेचे नेते शशिकांत जाधव यांनी व्यक्त केले.  


यावेळी व्यासपीठावर शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र समितीचे अध्यक्ष राजे भोसले, परभणी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, तालुका संपर्कप्रमुख रवी आमले, नगरसेवक तथा सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, आदिनाथचे संचालक देवानंद बागल, नगरसेवक दादा इंदुलकर, जगताप गटाचे नेते चिंतामणी नामदेवराव जगताप, नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत, सामाजिक कार्यकर्ते परेश बाबू काका दोशी, अशोक काका दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.  


यावेळी बोलताना शशिकांत जाधव म्हणाले की, आज नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र मंगेश व महेश यांनी दोघांनी मिळून स्वखर्चाने करमाळा शहरात लाखो रुपये किमतीचे श्री स्वामी समर्थ स्मारक व विठ्ठल रुक्मिणी तुळशी वृंदावन उभे करून करमाळ्याच्या वैभवात भर घातली आहे. आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अशाप्रकारे आपल्या गावाचे वैभव वाढवणारे स्मारक उभे करणे हे काम खरंच अभिमानास्पद आहे.  

यावेळी बोलताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत म्हणाले की, चिवटे परिवार हा शहराच्या विकासात सातत्याने आपला सहभाग नोंदवतो. कोरोना काळ असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असेल किंवा सर्वसामान्यांना मदत करायची असेल तर त्याला हक्काचे ठिकाण म्हणजे मंगेश चिवटे आहे. अशीच शहराचे वैभव वाढवणारी स्मारके चिवटे बंधूंनी उभी करावीत असे आवाहन केले

सध्या मंगेश चिवटे शिक्षक मतदार संघातून विधानपरिषद लढवण्याच्या तयारीत असून त्यांचे सर्वत्र प्रचार दौरे सुरू आहेत. याचा धागा पकडून शशिकांत जाधव म्हणाले की, तुमची राजकीय इच्छापूर्ती करण्यासाठी मिळेल ती ताकद एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभी करणार आहेत. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची केलेली रुग्णसेवा तुम्हाला नक्कीच न्याय देईल अशी भावना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा