Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

*तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील,बहुचर्चित औद्योगिक कर जप्ती करून वसुलीच्या मुद्द्यावर भाजपचे सावंत शिवाजी रामकृष्ण माजी सैनिक आंदोलनाच्या पवित्र्यात*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व इतर सर्व नावाजलेल्या कंपन्यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्या सुनावणीनंतर कर वसुलीची नोटीस बजावली असूनही  मागील अंदाजे तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तच कालावधीपासून जप्ती करून मिळण्याबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी चालढकल  करत असून ग्रामपंचायत अधिनियम १९५९/१९६० चे कलम १२९  व ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ प्रकरण ८ प्रमाणे जप्ती करून वसुली कारवाई करण्यात यावे याकरिता आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी (माजी सैनिक) यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी धाराशिव ,अध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव,  मुख्यकार्यकारीअधिकारी  जिल्हा परिषद धाराशिव, सभापती पंचायत समिती तुळजापूर, ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांना एका लेखी तक्रारी निवेदनाद्वारे  देण्यात आले आहे त्यामुळे तामलवाडी येथील पंचक्रशीत औद्योगिक वसाहतीमधील जप्ती करून कर वसुली संदर्भात अधिकारी व कर्मचारी हे वेळकाढूपना   करत आहेत त्याबाबत विरोधात खूप चर्चा होत आहे तसेच माजी सैनिक सावंत यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांना एक कुशल प्रशासक म्हणून जप्ती करा व ही वसुलीच्या कामाकरीता ०७ वेळा यापूर्वी आंदोलने करावी लागली आहेत, तसेच ३५ ते ४० वेळा सतत लेखी स्वरूपात पाठपुरावा केलेला आहे . याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी श्री सावंत यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांना विचारले की, आपण सध्या भाजप चे सक्रिय सदस्य आहात आपण तामलवाडी पंचायत समिती गण नुकतीच लढवली असतानाही राज्यकर्ते व प्रशासन आपली दखल का घेत नाहीत, त्यावर श्री सावंत यांनी उत्तर दिले की, ०८ एप्रिल २०२६ रोजी मी  आमच्या पक्षाचे सभापती व गटविकास अधिकारी तुळजापूर व तुळजापूर तालुकाध्यक्ष यांना प्रत्यक्ष बोललेला आहे व जप्ती करून कर वसुली करण्याकरता विनंती करण्यात आली होती त्यानंतर एक आठवडाचा वेळ झाला आहे त्यामुळे लेखी निवेदनाद्वारे वरील सर्वांनाकडून सुधारित करवाढीची रक्कम तत्काळ वरील नियमाप्रमाणे जप्ती करून वसूल करून पैसे ग्रामपंचायत तामलवाडीला देण्याचे आश्वासन दिले आहे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांनी कळवले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा