Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

महाराष्ट्राच्या मंत्रालयात जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन भीमजयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रण

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


 मुंबईत मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी या संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध वक्ते व 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचे लेखक जगदीश अशोक ओहोळ यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. 



मंत्रालयातील कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री महोदय व सर्व आमदार महोदयांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष भारत वानखेडे यांनी दिली.

सध्या महाराष्ट्रभर प्रबोधनाचा झंझावात निर्माण करणारे वक्ते व जागतिक कीर्तीचे पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ हे नव्या पिढीला, नव्या भाषेत बाबासाहेब सांगत आहेत त्यांच्या भाषणांना सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच आम्ही मंत्रालयात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. 

गुरुवार 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर परिषद सभागृहात हा व्याख्यान कार्यक्रम होणार आहे, तरी मंत्रालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष भारत वानखेडे व संयुक्त जयंती महोत्सव समितीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा