*निमगाव( मगराचे)- प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-९१३०१०१६०८*
शक्तीपीठ महामार्गाला कङाङुन विरोधा साठी राजु शेट्टींचा गुरूवारी वेळापुर येथे जन आक्रोश मेळावा होणार असून या मेळाव्यास
बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहणार आहेत
माळशिरस तालुका शक्तीपीठ विरोधी समिती .
शेतकऱ्यांकडून देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध व आक्रोश करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची जाहीर निषेध सभा वेळापुर ता माळशिरस येथे गुरूवारी 30 एप्रिल रोजी दुपारी ४वाजता ओंकार मंगल कार्यालय वेळापुर येथे आयोजित केली आहे माळशिरस पंढरपूर माढा तालुक्यातुन हमखास उपन्न देणाऱ्या बागयती भागातून शेतकऱ्यांच्या घरादारावर वरवंटा फिरवला जाणार असुन शेतकऱ्यांचे नुकसान करून सरकार कसला विकास करतय हा विकास आम्हाला मान्य नाही या साठी माळशिरस तालुका शक्तीपीठ विरोधी समितीने शेतकऱ्यांची जागृती केली आहे
शेतकऱ्यांचे नेते राजु शेट्टी यांनी या बाबत सखोल आभ्यास केला वडिलोपार्जित जोपासलेल्या जमीनी संपुष्टात येणार आहेत आंबा लागवड फसवी योजना कोणाचे हित संबंध आहेत याचा प्रखङ समाचार राजु शेट्टी घेणार आहेत
तरी परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी कुटुंबासह उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका शक्तीपीठ विरोधी समिती केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा