Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

*सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून एस कार्तिकयन यांनी स्वीकारला पदभार..*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तियन यांची नियुक्ती झाली आहे

सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना कुमार आशीर्वाद यांनी सीना नदी पुरावेळी त्यांनी उत्कृष्टपणे काम केले होते. तब्बल पावणेतीन वर्ष त्यांनी सोलापूरचे कामकाज केले. आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सीना नदीला आलेला महापूर त्यांनी संवेदनशीलपणे हाताळला. नव्याने आलेले जिल्हाधिकारी कार्तिकेयन हे २०२० बॅचचे आयएएस आधिकारी आहेत. त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा