*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा: श्री संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून भाविक भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदू मनोहरमामा भोसले प्रकरणांमध्ये दररोज नवनवे धक्कादायक खुलासे येत आहेत. घोटी येथील गट नं.318 मधील 27 एकरातील दोन एकर जागेत उभारण्यात आलेला आश्रम बेकायदेशीर असून बिगर शेतीची नोंद करण्यात आलेली नाही अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दैनिक लोकमत शी बोलताना दिली. भोंदू मनोहरमामा भोसले यांच्या पत्नी रूपाली मनोहर भोसले यांच्या नावावर घोटी येथील गट नंबर 318 चा सातबारा असुन त्यात 27 एकर शेतीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये दोन एकर जागेत आश्रमाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. याचे बिगरशेती (एन. ए.) परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे सदर आश्रमाचे बांधकाम बेकायदेशीर आहे. या प्रकरणी महसूल अधिनियम प्रमाणे नोटिस देणार असल्याचे ही तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले. उंदरगाव ता करमाळा येथे झोपडीतून लोकांचे भविष्य सांगायला सुरुवात केलेल्या मनोहरचा भोंदूगिरी चा प्रवास उंदरगाव ,घोटी ,नवी मुंबई ते गाणगापूर असा आहे. भोंदू मनोहर चे भक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरले आहेत. उद्योगपती राजकारणी चित्रपट सृष्टीतील कलाकार भोंदू मनोहरमामा कडे भविष्य पाहायला येत होते. पावती शिवाय भविष्य नाही... घोटी येथील आश्रमात अमावस्या ,पौर्णिमेला हजारो भाविक येत असे. भविष्य पाहण्यासाठी 11 ते 21 हजार रुपयांची पावती फाडली जात होती. भाविकांनी पावती फाडल्यानंतरच भोंदू मनोहरमामा त्यांना भेट द्यायचा दरम्यान नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात चे प्रकरण उजेडात आल्यानंतर भोंदू मनोहर भोसले आश्रमातून गायब झाला होता.
*भोंदू मनोहर भोसलेंसह साथीदाराचा 👆👆पोलीस कस्टडीतला मुक्काम वाढला; ट्रस्टच्या कॅशियरलाही अटक,तिघांनाही माढा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा