*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचामाळ शेजारील असणाऱ्या श्री कमला भवानी शुगर फॅक्टरीने आमच्या उसाचे बिल त्वरित द्यावे अन्यथा आम्ही करमाळा तहसील कार्यालयासमोर येत्या २७ एप्रिल २०२६ रोजी उपोषणास बसू असा इशारा आलेश्वर तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील ऊस उत्पादकानी करमाळा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे
निवेदनात आलेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे असे म्हटले आहे की आम्ही आलेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2025 ते 26 या कालावधीमध्ये करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ जवळील श्री कमला भवानी ग्लोबल शुगर फॅक्टरी यांना गाळपासाठी ऊस दिला होता परंतु सदर कारखान्याने उसाचे बिल अद्याप पर्यंत आम्हाला अदा केलेले नाही त्यामुळे आम्हाला नाहक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे उसाचे बिल मध्यम पर्यंत न मिळाल्याने आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तेव्हा कारखान्याने आमच्या उसाचे बिल त्वरित द्यावे अन्यथा आपल्या कारखान्यासमोर येत्या 27 एप्रिल 2026 रोजी आम्ही आलेश्वर येथील ऊस उत्पादक बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा शेवटी ऊस उत्पादकांनी दिला आहे
सदर निवेदनावर आलेश्वर येथील ऊस उत्पादक विजयराव पाटील, राजू सलीम अखिल मुलाणी, दयानंद सूर्यवंशी, हबीब मुलाणी, राजेंद्र पाटील, भारत पाटील, चंदन पाटील, चंद्रहास चव्हाण, पोलीस पाटील सादिक मुलाणी, गजेंद्र दळवी, ज्योतीराम दळवी, आतीख मुलाणी, शिवाजी सूर्यवंशी, सौ बिलकिस मुलाणी वैभव सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, शारदाबाई सूर्यवंशी, महादेव चव्हाण, दत्तात्रेय चव्हाण, अशुभा सूर्यवंशी, रामचंद्र चव्हाण, काशिनाथ नगरे, मनीषा धनवे, नंदकुमार काळे, हनुमंत सूर्यवंशी, रफिक शेख तसेच राहुल चव्हाण आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत
निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री मुंबई, सहकार मंत्री मुंबई, साखर आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस निरीक्षक करमाळा चेअरमन कमलाभवानी शुगर कारखाना आदिना पाठवल्या आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा