*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे पंचायत समिती तुळजापूर मार्फत प्रशासनाच्या सहकार्याने जनता दरबार किंवा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ज्याचे अध्यक्ष श्री विक्रमसिंह देशमुख, सभापती पंचायत समिती तुळजापूर होते ज्याचा उद्देश प्रशासनाच्या गावगाडा लोकांच्या दारी घेऊन जाण्याचा आहे त्याप्रसंगी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी तालुका तुळजापूर चे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांनी सभापती व प्रशासनास निवेदन दिले
यामध्ये तामलवाडी येथे होत असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावाविषयी मुद्दे स्पष्टपणे लिहिले होते त्यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन योजनेमध्ये पुरवणी आराखडा बनवणे व या कामांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे मोडतोड झाली होती.
त्याचे दुरुस्ती करणे, सर्व समाजातील लोकांच्या घरकुलचे हप्ते Picnic लवकर देणे एजंटावर नियंत्रण ठेवणे, अनुसूचित जाती जनजाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मागील ०४ (चार) वर्षापासून निधी मिळाला नाही त्यासाठी भरीव निधी सन २०२५-२५ मध्ये देणे, जानेवारी २०२५ मध्ये दिलेल्या शेतरस्त्यांच्या प्रस्तावास प्राथमिकतेने मान्यता देणे व तसेच भांडवली मूल्यांवर आधारित भरण्यात येणारा तामलवाडी ग्रामपंचायतचा कंपनी कर ग्रामपंचायत अधिनियम आणि १९५९/१९६० च्या कलम १२९ प्रमाणे जप्ती करून वसुली करून देणे याबाबत लवकरात लवकर सकारात्मक विचार करून तात्काळ सर्व कामे मार्गी लावण्याकरिता विनंती करण्यात आली या प्रसंगी प्रशासनामार्फत विस्तार अधिकारी (कृषी) दिलीप नडगिरी यांनी निवेदन स्वीकारले.
त्याप्रसंगी काटगाव जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती (दादा) माळी व इतर अधिकारी/कर्मचारी/ग्रामसेवक उपस्थित होते तसेच तुळजापूर विधानसभा आमदार राणा (दादा) जगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनाही त्या निवेदनाची प्रत देऊन कामे मार्गी लावण्याकरता विनंती करण्यात आली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा