Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ एप्रिल, २०२६

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बावडा येथे मोठ्या उत्साहात, समतेचा संदेश देत बावड्यात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बावडा येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी बुध्दपूजा घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी धम्मवंदना, संघवंदना, त्रिशरण पंचशील गाथेचे पठन बौद्धाचार्य गौतम जगताप व बौद्ध उपासिका इंदू शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शितल कांबळे, उपाध्यक्ष संदेश सरवदे, खजिनदार अण्णा कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला सायंकाळी आंबेडकर चौक येथून सुरूवात करण्यात आली. आंबेडकर जयंती शाहू महाराज चौक, साठे नगर, ग्रामपंचायत, बाजार पेठ मार्गे भैरवनाथ मंदिर, भांडगाव चौक मार्गे आंबेडकर चौक अशी काढण्यात आली. यावेळी आयोजित मिरवणुकीत आकर्षक सजवलेले रथ, ढोल-ताशांचा आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले युवक-युवती यामुळे कार्यक्रमाची मोठी शोभा वाढली. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली असून गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. अनेक तरूणाईने व महिलांनी डिजेच्या गाण्यावर नृत्य करण्याचा आनंद लुटला. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात महिलांची यंदाच्या वर्षी मोठी गर्दी पाहायला मिळाली.                     



         . डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडण्यासाठी जयंती उत्सव मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सजवलेल्या रथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या, डिजे च्या गजरात व निळ्या झेंड्यांच्या लहरीत ही मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली. युवकांनी नृत्य सादर करत उत्साहात सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित येत्या (२०) एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या लोकप्रिय महिला गायिका कडूबाई खरात यांचा भिमगितांचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांनी केले आहे.

फोटो - सजवलेल्या रथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा