Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ एप्रिल, २०२६

विक्रांद टाईम्स चे '' वेदमूर्ती ते राष्ट्रसंत " या विशेष अंकाचे छ. संभाजीनगर तथा हरिद्वार येथे थाटात प्रकाशन संपन्न, प. पू. स्वामी गोविंददेवगिरी यांची वेदमूर्ती ते राष्ट्रसंत वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी.

 पुणे, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



वेदमूर्ती ते राष्ट्रसंत

या प.पू.स्वामी गोविंददेवगिरी यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठी व हिंदी भाषेत ‘विक्रांद टाइम्स गौरव विशेषांक’ चे शुभ प्रकाशन परम पूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचे हस्ते गुरुग्राम ( हरिद्वार ) येथे तर छ. संभाजीनगर येथे मंत्री ना.अतुलजी सावे तसेच स्वामी गोविंद देव गिरी यांचे शुभ हस्ते तापडिया कासलीवाल ग्राउंड येथे  संपन्न झाले. यावेळी अरुणकुमार मुंदडा व सौ. शारदा मुंदडा, सुचिता मुंदडा, सचिन मुंदडा व बालगापोल यांच्यासह हजारो भक्त मंडळी उपस्थित होते. 

 आजचा हा पावन क्षण केवळ एका विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नसून श्रद्धा, समर्पण आणि गुरु -शिष्य परंपरेच्या दिव्य संगमाचा साक्षीदार आहे. हा तो अलौकिक प्रसंग आहे, जिथे शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणार्‍या भावना भक्तीच्या रूपात साकार होत आहेत.


आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की, राष्ट्रसंत पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पावन उपस्थितीत या  विशेषांकाचे प्रकाशन होत आहे. हा केवळ एक विशेषांक नसून एका साधकाच्या हृदयातून उमटलेली गुरुदक्षिणा आहे. श्रद्धेच्या त्या शब्द -सुमनांचे समर्पण आहे, जे आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केले गेले आहेत. या गौरवपूर्ण विशेषांकाचे निर्माते, ज्येष्ठ पत्रकार, ‘विक्रांद टाइम्स' आणि ‘अग्रसेन टाइम्स'चे मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा आहेत. त्यांनी ज्या निष्ठेने, समर्पणाने आणि भावनिक ओलाव्याने हे कार्य पूर्ण केले आहे, ते खरोखरच प्रेरणादायी आहे असे मत यावेळी अनेक मान्यवर यांनी  व्यक्त केले. हे केवळ संपादनाचे काम नसून, त्यांच्या बालपणी पूज्य स्वामीजींच्या सान्निध्यात मिळालेल्या संस्कारांचे पुनस्मरण आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या त्या पावन भूमीवर, जिथे एका बालकाने शिक्षणाचे पहिले संस्कार ग्रहण केले, तिथून सुरू झालेला हा आध्यात्मिक प्रवास आज या विराट स्वरूपात आपल्यासमोर उभा आहे. वेदमूर्ती ते राष्ट्रसंत हा प्रवास काही सोपा नव्हता. या सर्व वाटचालीचे मुंदडा परिवार साक्षीदार आहे. या अंक निर्मितीत सर्व जाती धर्माच्या लेखक मंडळीचे अनमोल सहकार्य लाभले आहे. स्वामीजी आणि मुंदडा जी यांच्यातील हा जिव्हाळ्याचा संबंध केवळ परिचयाचा नसून संस्कार, मार्गदर्शन आणि स्नेहाचा आहे. जो काळासोबत अधिकच दृढ होत गेला. आज जेव्हा हजारो भाविकांच्या उपस्थितीत या विशेषांकाचे प्रकाशन झाले, तेव्हा हा केवळ एक अंक राहत नाही, तर तो एक संदेश आहे.  गुरूंप्रती असलेली कृतज्ञता केवळ शब्दांतून नव्हे, तर कर्मातून व्यक्त झाली पाहिजे.

हा विशेषांक पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या चरणी अर्पण केलेले एक विनम्र शब्द-सुमन आहे.  शेवटी, हीच प्रार्थना आहे की हा विशेषांक प्रत्येक वाचकाच्या अंतर्मनात श्रद्धा, संस्कार आणि आध्यात्मिक चेतनेचा दीप प्रज्वलित करेल ही भावना शेवटी अरुणकुमार मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा