अकलूज प्रतिनिधी
के.एस..लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त महादेव मंदिरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
अकलूजच्या महादेव मंदिरात रक्तदान संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन वेळापूर येथील बृहन्मठ मठाधीपती श्री.ष.ब्र.१०८ सद गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलीत करण्यात आले.या रक्तदान शिबिरात तरूणांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता.
यावेळी प्रसंगी मार्गदर्शन करताना सदाशिव शिवाचार्य महाराज म्हणाले,रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाज उपयोगी एक चांगला उपक्रम राबवून समाजाच्या हितासाठी काम केल आहे.अशा कार्यक्रम राबविल्यामुळे समाजामध्ये ऐकी रहाते व आजच्या रक्तदान शिबीरामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी व सदस्य,महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा