*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तडवळ येथुन दिनांक २३/०२/२०२६ रोजी १०.२५ वाजताच्या सुमारास ओकार शुगर फॅक्टरी तडवळ, ता. अक्कलकोट जिल्हा सोलापडु येथुन २ अनोळखी आरोपी यांनी आपसांत संगणमत करुन गाडीची बनावट कागदपत्रे बनवुन, गाडीला खोटा आर.टी.ओ कमांक लावुन, खोटा फास्ट स्टॅग लावुन फसवणुक करण्याच्या उद्देशाने गाडी फिर्यादीच्या ओळखीचे वाहतुक करणारे विशाल यादव यांची असल्याचे भासवुण फिर्यादीचा विश्वास संपादन करुन साखर व वाहतुकीसाठी पैसे असे एकुण १८,४७,२००/- रुपयांचा मुद्देमाल फसवणुक करुन अपहार केलेला आहे म्हणुन दिलेल्या तकारीवरुन अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे गु.र.क. १२८/२०२६भा.न्या.सं.क. ३३६(१) (२), ३३८,३१६ (२), ३१८(४), ३१९, ३(५), गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयांमध्ये आरोपी यांनी सर्वप्रथम ब्लॅक बक ट्रान्सपोर्ट अॅपच्या मदतीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर उत्तर प्रदेश लाईनचे काही भाडे आहे का याबाबत विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना तडवळ येथील ओकार शुगर फॅटरी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापुर येथुन साखर घेवुन ती बाराबकी उत्तर प्रदेश येथील बिस्कीट कंपनीमध्ये पाठवायची असल्याचे सांगितले त्याप्रमाणे आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्याकरीता त्यांना गाडीचे कागदपत्रे पाठवुन दिली. त्यांनतर फिर्यादी यांनी त्याना गाडी ओकार शुगर फॅटरी तडवळ येथे पाठविण्यास सांगितली. त्यांनतर फिर्यादी यांच्या सांगण्यावरुन कारखान्यावरुन गाडी भरुन बील बनवुन गाडी पाठविण्यात आली. त्यांनतर गाडीचे ड्रायव्हर व किनर यांनी फिर्यादी यांच्याकडुन डिजेलकरीता, गाडी दुरुस्तीकरीता व खर्चा करीता अशी वेगवेगळी कारणे सांगुन फिर्यादी यांच्याकडुन पैसे घेतले व आरोपी यांनी फिर्यादी यांच्याशी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत संपर्क ठेवला त्यांनंतर फिर्यादी यांच्याशी संपर्क केलेले सर्व मोबाईल बंद केले. त्यांनतर फिर्यादी यांनी त्यांना दिलेल्या गाडी नंबरवरुन माहिती घेवुन गाडी मालकांकडे गेले तर ती गाडी गुन्हयांच्या वेळी बनारस यांठिकाणी होती त्यावेळी फिर्यादी यांना लक्षात आले की आरोपी यांनी आपणाला दिलेली कागदपत्रे, गाडीचा नंबर, हे सर्व खोटे आहे त्यावेळी फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे येवुन तकार दिली
अक्कलकोट पोलीस ठाणे येथे गुन्हां नोंद झाल्यानंतर प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांची लोकेशन व ठिकाणे हि उत्तर प्रदेश राज्यातील कानपुर शहरातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले. सदर आरोपी यांचा शोध घेण्यासाठी स.पो.नि. प्रशांत बधे, पो.ह.क १८०९ / दासरे, पो.ना. ९५४/ राठोड, पो.ना.क ५५८/ मुल्ला असे कानपुर येथे गेले. तांत्रिक माहितीच्या आधारावर कानपुर शहर येथील संशयित इसम यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे गुन्हयांच्या अनुषंगाने तपास केला असता त्याच इसमांचा मोबाईल चोरीला गेलेला असल्याचे आढळुन आले यावरुन असे लक्षात आले की सदरच्या गुन्हयांत वापरण्यात आलेले मोबाईल व सिम कार्ड हि चोरीची आहेत. त्यांनतर प्राप्त तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यास करुन संशियत इसम आकाश अशोक कुशवाह यांस ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी इतर आरोपी यांची नावे सांगितली त्याप्रमाणे इतर आरोपी अभिषेक श्रवन पांडे, उपेंद्रसिंग रविंद्रसिंग भदोरीया व अरविंद कुमार भगवान दास गुप्ता अशा एकुण चार आरोपी यांना अटक करुन वरील गुन्हा उघड करुन गुन्हयांतील साखरेची ५० किलो वजनाची ८३३ गोणी साखर व गुन्हयांत वापरण्यात आलेले वाहन अंदाजे २४ लाख रुपये किंमतीची टाटा ट्रक जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्हयांच्या अनुषंगाने नागरिकाना व ट्रान्सपोर्ट धारकांना अहवान करण्यात येते की, कोणाचा मोबाईल चोरी अगर हरविल्यास तात्काळ सिमकार्ड बंद करण्यात यावे अशा सिमचा व मोबाईलचा वापर करुन अशाप्रकारचे गुन्हे केले जात आहेत.
सदर कारवाई श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, श्री. प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक व श्री विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश चिल्लावार मा. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पो.ह.क १८०९/ सुभाष दासरे, पो.ना.क ९५४/ जगदीश राठोड, पो.ना.क ५५८/ सिंकदर मुल्ला, पो.शि.क. ७६२/गजानन शिंदे व पो.शि.क ८८६/ मळसिध्द कोळी यांनी केला असुन त्यास तांत्रिक मदत पो.ह.क २६८/ नबीलाल मियावाले, सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित कर्पे, पोलीस शिपाई रतन जाधव पोलीस शिपाई राहुल सोनकर यांनी केली असुन अतिशय गुंतागुतीचा असा गुन्हा उघड केलेला आहे.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा