Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

*महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आवाटी येथे कै. जनाबाई एकनाथ खताळ सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विविध उपक्रमाने साजरी*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



*महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आवाटी येथे कै. जनाबाई एकनाथ खताळ सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. विश्वरत्न 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आवाटी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते.

या मध्ये वकृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धांमध्ये तिसरी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत खताळ सर व ज्येष्ठ वाचक श्री जगन्नाथ हराळे यांच्या हस्ते करण्यात आले . 

या स्पर्धेमध्ये लहान आणि मोठा गट अश्या गटातून सहभाग नोंदवला. लहान गटामध्ये निबंध स्पर्धेतून प्रथम क्रमांक अंजली मोहन खताळ , द्वितीय क्रमांक श्रेया सचिन भाग्यवंत  तर मोठ्या गटातून प्रथम नंदिनी अंकुश शिंदे , द्वितीय अंकिता अर्जुन चोपडे व तृतीय नंदिनी नागेश साळवी यांना मिळाला. चित्रकला स्पर्धातून लहान गटातून प्रथम माधुरी अंकुश शिंदे, द्वितीय संजना शिवाजी शिंदे व तृतीय श्रेया सचिन भाग्यवंत  तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक अनुष्का अर्जुन चोपडे, द्वितीय अंजली विष्णु शिंदे व तृतीय स्वप्नाली प्रवीण शिंदे यांना मिळाला. रांगोळी स्पर्धेमध्ये लहान गट स्वरा गणेश नलवडे, द्वितीय अंजली मोहन खताळ व तृतीय स्नेहल सुनील तरटे तर मोठ्या गटातून प्रथम नंदनीय अंकुश शिंदे, द्वितीय  सई गणेश शिर्के व तृतीय क्रम गौरी तानाजी बंडगर यांना मिळाला. वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण सोळा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक विपुल महालिंग हुबाले, द्वितीय नंदिनी अंकुश शिंदे व तृतीय श्रुती लक्ष्मण वाघमोडे यांना मिळाला .वकृत्व स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करून उत्कृष्ट असे भाषण केले. या सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या वतीने बक्षीस वितरनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितत पार पडला. या कार्यक्रमासाठी नानासाहेब गायकवाड, सर्जेराव गायकवाड, त्रिंबक हुबाले , महालिंग हुबाले , सुभाष गायकवाड, जगन्नाथ हराळे, पोलीस पाटील अनिल लोंढे,  पी.एम. शिंदे सर वाचनालय सचिव मोहन खताळ, युसुफ खान, बाबा खान, फरीद खान, रमेश शिंदे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

वाचनालयाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत एकनाथ खताळ सर यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर सामाजिक, राजकीय आधारित माहिती देऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री के. एन. शिंदे सरांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा