Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड कार्यालयांमध्ये महात्मा फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तपणे जयंती उत्साहात साजरी Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना हेमंत शिंदे म्हणाले

सर्व भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी, नागरिक म्हणून समान अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

अन्यायाची रात्र संपवून न्यायाचा आणि समतेचा प्रकाश पसरवणारा सूर्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

संविधान निर्मीतीसोबतच आधुनिक भारत घडवण्यासाठीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत व्यापक आणि मोलाचे योगदान दिले आहे.शेतकऱ्यांसाठी लढणारे बाबासाहेब शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या खोतीप्रथेविरोधात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती प्रथा बंद पाडली.

बाबासाहेबांच्या भुमिकेनुसार स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने जमीनदारी नष्ट करून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीचे वाटप केले. कुळ कायद्यानुसार "कसेल त्याची जमीन" केली.

सरकारने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कर्ज, कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध करायला पाहिजे, अशी बाबासाहेबांची भूमिका होती.महिलांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही", अशी बाबासाहेबांची ठाम भुमिका होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान

आपल्या देशातील भक्ती परंपरेतील अनेक महान संतांची शिकवण आपल्या संविधानात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी ही मूल्ये समाजात रुजवली. याच विचारांतून प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी संविधान घडवले.

बाबासाहेबांच्या आग्रहामुळे संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला गेला. त्यानुसार गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी करणे सरकारची जबाबदारी आहे. लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगाराच्या संधी देण्यासाठी पैसे नाहीत, असे कारण कोणत्याही सरकारने देऊ नये, गोरगरीबांचे कल्याण करण्यासाठी सरकार बांधील असेल. या देशाचे सरकार हे धर्मनिरपेक्षच असावे सर्व धर्माचे सरकारसमोर एकच स्थान असेल ही बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. चला, भीमप्रतिज्ञा घेऊया आणि भीमजयंती विचारांची जयंती म्हणून साजरी करूया ! या वेळी उपस्थित पुणे विभागीय मा. कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड नितीन खटके,निलेश पाटील, हेमंत शिंदे, अतुल निर्मळ, अजित उपाध्दे,सागर साखरे, आदिनाथ माने,किशोर कदम,उमेश मोहिते सोमनाथ जाधव, इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा